Pimpri Chinchwad | कामावरून काढले म्हणून पगार मागत केली दगडाने मारहाण
By रोशन मोरे | Updated: April 8, 2023 16:57 IST2023-04-08T16:55:14+5:302023-04-08T16:57:02+5:30
ही घटना गुरुवारी (दि.६) सूसमधील शोरूमच्या पार्किंगमध्ये घडली...

Pimpri Chinchwad | कामावरून काढले म्हणून पगार मागत केली दगडाने मारहाण
पिंपरी : पगाराची मागणी करणाऱ्याला ऑफिसकडे संपर्क कर, असे सांगितले असता त्याने आणि त्याच्या तीन साथीदारांनी मिळून दगडाने मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि.६) सूसमधील शोरूमच्या पार्किंगमध्ये घडली. याप्रकरणी शुक्रवारी (दि.७) हिंजवडी पोलिस ठाण्यात शिवम संतोषी सोनी (वय २३, रा. वारजे माळवाडी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी करण विजय जोशी (वय १९, रा. सुतारवाडी), आदित्य पाईके, वैभव कोढार यांच्यासह आणखी एका जणावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शोरूमच्या पार्किंगमध्ये काम करताना आरोपी तेथे आले. आरोपी करण हा तेथे पूर्वी सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. मात्र, त्याला कामावरून काढण्यात आले होते. त्याने फिर्यादी यांना पगाराबाबत विचारले असता त्याला ऑफिसकडे संपर्क साधण्यासाठी सांगितले. मात्र, त्याने आणि त्याच्यासोबत आलेल्या त्याच्या इतर आरोपी मित्रांनी फिर्यादी यांना मारहाण केली तसेच डोक्यात दगड मारून जखमी केले. तेथे असलेला सुरक्षारक्षक गौरशंकर सोनी (वय १९) हे फिर्यादीला वाचविण्यासाठी पुढे आले असता त्यांना ही आरोपींनी मारहाण केली, असे फिर्यादीत नमूद आहे.