सिगारेट मागितल्याने वाद, तरुणाला दगडाने मारहाण; पिंपरीत दोघांवर गुन्हा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 18:40 IST2021-04-06T18:40:21+5:302021-04-06T18:40:37+5:30

रविवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास फिर्यादी घोडके हे लिनन गार्डनजवळ सिगारेट पिण्यासाठी गेले होते.

Beaten by stone to youth due to cigarate issue, Crime registred in Pimpri-Chinchwad | सिगारेट मागितल्याने वाद, तरुणाला दगडाने मारहाण; पिंपरीत दोघांवर गुन्हा 

सिगारेट मागितल्याने वाद, तरुणाला दगडाने मारहाण; पिंपरीत दोघांवर गुन्हा 

पिंपरी : सिगारेट मागितल्याने वाद होऊन तरुणास दगडाने मारहाण केली. याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळे सौदागर येथे रविवारी (दि. ४) रात्री ही घटना घडली.

बबलू बालाजी बनसोडे आणि किसन विजय गायकवाड  (रा. विश्‍वशांती कॉलनी, पिंपळे सौदागर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. प्रदीप राजकुमार घोडके (वय २०, रा. पिंपळे सौदागर), असे जखमी तरुणाचे नाव असून त्यांनी सोमवारी (दि. ५) याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास फिर्यादी घोडके हे लिनन गार्डनजवळ सिगारेट पिण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी गायकवाड आणि बनसोडे हे दोघेजण तिथेच होते. आरोपी बनसोडे याने फिर्यादी घोडके यांच्याकडे सिगारेट मागितली. या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. आरोपींनी फिर्यादी घोडके यांना दगडाने मारून जखमी केले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Beaten by stone to youth due to cigarate issue, Crime registred in Pimpri-Chinchwad