शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

तळेगाव दाभाडेला निवडणूक खर्चाच्या वादातून माजी सभापतीचा वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 1:25 PM

तळेगाव दाभाडे येथे नगराध्यक्षांचे पती संदीप जगनाडे आणि तळेगाव नगर परिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती प्रकाश ओसवाल यांच्यात निवडणूक खर्चाच्या वादातून सोमवारी (दि. ०६) सकाळी धक्काबुक्की झाली.

ठळक मुद्देसंदीप जगनाडे हे भाजपच्या नगराध्यक्ष चित्रा जगनाडे यांचे पती जगनाडे व  ओसवाल यांच्यात सकाळी घरासमोरील रस्त्यावर जोरदार वाद

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे येथे नगराध्यक्षांचे पती संदीप जगनाडे आणि तळेगाव नगर परिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती प्रकाश ओसवाल यांच्यात निवडणूक खर्चाच्या वादातून सोमवारी (दि. ०६) सकाळी धक्काबुक्की झाल्याचे समजते. यात ओसवाल यांच्या बोटाला दुखापत झाली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार नोंदविण्यात आलेली नाही.संदीप जगनाडे हे भाजपच्या नगराध्यक्ष चित्रा जगनाडे यांचे पती आहेत. जगनाडे व  ओसवाल यांच्यात सकाळी घरासमोरील रस्त्यावर जोरदार वाद झाला. वाद विकोपाला जाऊन प्रकरण धक्काबुक्कीपर्यंत पोहोचले. त्यात मोटारसायकल पडताना ओसवाल यांच्या बोटाला गंभीर दुखापत होऊन रक्त आले, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. यासंदर्भात प्रकाश ओसवाल यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. जगनाडे  यांच्याशी संपर्क  साधला असता हे प्रकरण किरकोळ  होते. ते सकाळीच मिटले असल्याचे त्यांनी सांगितले. नगराध्यक्ष निवडणुकीच्या खर्चाबाबत जगनाडे व ओसवाल यांच्यात जुना वाद असल्याचे समजते. ओसवाल हे सकाळी ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज यांना अभिषेक करण्यासाठी निघाले असताना, मॉर्निंग वॉकला निघालेले जगनाडे त्यांना दिसले. दोघे समोरासमोर आल्याने वादाची ठिणगी पडली आणि त्याचे पर्यवसान धक्काबुक्कीत झाल्याचे समजते. 

टॅग्स :Crimeगुन्हाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड