शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

दारू न दिल्याने बार मॅनेजरसह कामगारांवर चाकूने हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 15:10 IST

हल्लेखोरांचा पाठलाग करून पुण्यातून अटक ; माळेगाव पोलिसांची कामगिरी

सांगवी (बारामती) : मध्यरात्री बारवर जाउन दारू न दिल्याचा राग मनात धरून बार मॅनेजरसह  कामगारांना धक्काबुक्की करत एकाच्या पोटात चाकू खुपसून इतर कामगारांवर चाकूने हल्ला करून फरार झालेल्या  हल्लेखोरांना पाठलाग करून  मंगळवारी पहाटे हडपसर गाडीतळ परिसरातून ताब्यात घेण्यात माळेगाव पोलिसांना मोठे यश आले आहे. चाकूने हल्ला केल्याबाबत हॉटेल मॅनेजर श्री ऋषिकेश भाऊसाहेब मिंड यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात  विशाल बाबा मोरे, संदेश उर्फ आबा अनिल शिंदे दोघे (रा. कऱ्हावागज ता.बारामती ),निखिल अशोक खरात रा.आमराई बारामती ता.बारामती जि.पुणे यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे.क-हावागज (ता. बारामती) या गावच्या हद्दीत असलेल्या हॉटेल शारदा एक्झिक्युटिव्ह बार, रेस्टॉरंट अँड लॉजींगवर  सोमवार (दि.१३ रोजी) रात्री दहा वाजता बंद करून मॅनेजर तसेच इतर सर्व कामगार काम आवरून अकरा वाजण्याच्या सुमारास झोपण्यासाठी गेले होते. दरम्यान मध्यरात्री पाऊणे दोन वाजण्याच्या सुमारास  विशाल बाबा मोरे, संदेश उर्फ आबा अनिल शिंदे,निखिल अशोक खरात यांनी हॉटेल मॅनेजर ऋषिकेश भाऊसाहेब मिंड (मूळ रा.कडा ता.आष्टी जि.बीड) सध्या रा.हॉटेल शारदा बार अँड लॉजिंग कऱ्हावागज ता.बारामती जि.पुणे) हे हॉटेल शारदा मध्ये झोपलेल्या रूममध्ये घुसून शिवीगाळ करीत मला दारू देत नाहीस का आमच्याच गावात हॉटेल चालवून आम्हालाच नडतो काय आता तुला सोडत नाही. आता आम्हाला नड असे बोलून मारहाण करून फिर्यादीस खाली पाडले. तसेच त्यानंतर हल्लेखोर निखिल खरात याने त्याच्या जवळील असलेले धारदार चाकूने फिर्यादीवरून हल्ला केला. यावेळी  फिर्यादी पटकन मागे सरकले असता तो वार फिर्यादीच्या पायावर लागला त्यामुळे हॉटेलमधील कामगार फिर्यादीस वाचविण्याकरिता आले होते. दरम्यान मध्यस्थी आलेल्या  दिनेश वर्मा मूळ रा.उत्तर प्रदेश याच्या पोटात हल्लेखोर निखिल खरात याने धारदार चाकू खुपसला तसेच इतर कामगारांवर देखील चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर आरोपी चार चाकी वाहनातून पळून गेले.घटनेची माहिती माळेगाव पोलीसांना मिळाली असता गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून माळेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे यांनी गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक देवीदास साळवे यांना हल्लेखोरांचा तपास करण्याचे आदेश दिले. त्यानंतर तात्काळ पथक रवाना केले हल्लेखोर  विशाल बाबा मोरे, संदेश उर्फ आबा अनिल शिंदे, निखिल अशोक खरात हे फरार झाले होते.माळेगाव पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हल्लेखोरांना पाठलाग करून  मंगळवारी पहाटे हडपसर गाडीतळ परिसरातून ताब्यात घेतलेले आहे. सहायक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे,पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर,देविदास साळवे,पोलीस अंमलदार राहुल पांढरे,विजय वाघमोडे,ज्ञानेश्वर मोरे,नंदकुमार गव्हाणे,अमोल राऊत, सागर पवार,जयसिंग कचरे,अमोल कोकरे यांनी ही कामगिरी केली आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक