शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

हेल्मेट न घालणाऱ्या वाहनचालकांना तिळगुळाच्या हेल्मेटने जनजागृती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 6:51 PM

रस्ता सुरक्षा अभियान : अपघाताची भीती बसण्यासाठी अपघातग्रस्त वाहनाची मांडणी...

ठळक मुद्दे वाहनाची अपघातामुळे झालेली अवस्था पाहण्यासाठी नागरिक गर्दी नियम न पाळणाऱ्या वाहन चालकांना तिळगुळाचे वाटप करून मार्गदर्शन

चिंचवड: उप प्रादेशिक परिवहन विभाग व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ वे रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रम राबविण्यात येत आहे. वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे व अपघाताच्या घटना टाळाव्यात यासाठी विशेष जनजागृती अभियानाची सुरवात चिंचवड मधील चापेकर चौकातून करण्यात आली.वाहन चालकांना वाहन चालविताना नियमांचे पालन न केल्यास होणाऱ्या अपघाताचे गांभीर्य लक्षात यावे यासाठी चौकात अपघात ग्रस्त वाहन ठेवण्यात आले आहे. या वाहनाची अपघातामुळे झालेली अवस्था पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत.

पुणे-सोलापूर महामार्गावर शीट बेल्ट न लावल्यामुळे या वाहनातील दोन जणांचा मृत्यू झाला तर दोन नायबंदी झाले आहेत.या बाबत ची माहिती असणारा फलक या ठिकाणी लावण्यात आले आहेत.याच चौकात हेल्मेट न घालणाऱ्या वाहनचालकांना तिळगुळ असणारे हेल्मेट घालण्यात आले. दंडात्मक कारवाई न करता त्यानां स्वतःची व आपल्या परिवाराची काळजी घेण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.याप्रसंगी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील,सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सोबोध मेडशीकर,सचिन विधाते,विकास माळवे,भालचंद्र कुलकर्णी,अजय कराळे, प्रवीण खेडकर,सिद्धाराम पांढरे,अनुश्री केंद्रे, अंजली पाथरे, गीतांजली काळे, गौरी रासकर,चिंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक भीमराव शिंगाडे. वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक खंडेराव खैरे यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.वाहन चालकांना शिस्त लागावी यासाठी नियम न पाळणाऱ्या वाहन चालकांना तिळगुळाचे वाटप करून मार्गदर्शन करण्यात आले.जे वाहन चालक हेल्मेट घालून जात होते त्यानां सन्मान चिन्ह,गुलाब पुष्प व तिळगुळ देऊन सन्मानित करण्यात आले.या साठी पारंपरिक वेशभूषा करीत स्वायत्त श्रमिक महिला संघाच्या निर्मला जगताप, अंजली ब्रह्मे,अनिता भाकरस,निरजा देशपांडे,किमया खांदवे,उदय वाडेकर,संतोष शेटे यांनी सहकार्य केले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडtraffic policeवाहतूक पोलीसPoliceपोलिसroad safetyरस्ते सुरक्षा