देहूरोड पोलीस ठाण्यात महिला आरोपीचा गळा आवळून आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 15:12 IST2020-10-31T15:12:22+5:302020-10-31T15:12:56+5:30
आत्महत्येस परावृत्त करणाऱ्या महिला पोलिसाला शिवीगाळ करून बघून घेण्याची धमकी दिली.

देहूरोड पोलीस ठाण्यात महिला आरोपीचा गळा आवळून आत्महत्येचा प्रयत्न
पिंपरी : एका गुन्ह्यात अटक केलेल्या महिला आरोपीने अंगावरील कपडे फाडून त्याच्या तुकड्याने गळा आवळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना देहूरोड पोलीस ठाण्यात घडली. आत्महत्येस परावृत्त करणाऱ्या महिलापोलिसाला शिवीगाळ करून बघून घेण्याची धमकी दिली.
रेणुका सुहास सुवर्णकार (वायब४०, रा. बालाजी निवास, आळंदी रोड भोसरी) असे आरोपीचे नाव आहे. दीपाली वासुदेव मुळूक (वय ३०, पोलीस शिपाई) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी सुवर्णकार यांना एका गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली असून, त्यांना पोलीस ठाण्याच्या तुरुंगात ठेवले होते. आरोपीने २९ ऑक्टोबरला पहाटे साडेचार वाजता अंगावरील कपडे फाडून त्याने गळा आवळून आत्महत्येचा प्रयत्न केला. फिर्यादींना त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्यांच्याशी झटापट केली. तसेच अश्लील शिवीगाळ करून फिर्यादी आणि ठाण्यातील पोलिसांना पाहून घेण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.