Pimpri-Chinchwad Crime | जावयाकड़ून सासऱ्यावर कोयत्याने हल्ला; भोसरी एमआयडीसीतील घटना
By रोशन मोरे | Updated: March 18, 2023 19:00 IST2023-03-18T19:00:37+5:302023-03-18T19:00:53+5:30
भांडणाचा राग मनात धरून फिर्यादीच्या गुडघ्यावर उलटा कोयता मारून पाय फ्रॅक्चर...

Pimpri-Chinchwad Crime | जावयाकड़ून सासऱ्यावर कोयत्याने हल्ला; भोसरी एमआयडीसीतील घटना
पिपंरी : सासऱ्याच्या भावासोबत झालेल्या भांडणातून भाचे जावयाने सासऱ्यावर कोयता घेऊन हल्ला केला. या हल्ल्यात सासरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी (दि.१५) एमआयडीसी भोसरी येथे घडली. या प्रकरणी सिताराम नागोराव पवार (वय ४०, रा. एमआयडीसी भोसरी) यांनी शुक्रवारी (दि.१७) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अराहूल बाळ पवार (वय ३०, रा. वाकड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांची पत्नी, भाऊ यांच्या सोबत झोपडीबाहेर बोलत उभे होते. तेथे अचानक आरोपी आला. त्याने फिर्यादीचा भाऊ शंकर पवार याच्यासोबत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादीच्या गुडघ्यावर उलटा कोयता मारून पाय फ्रॅक्चर केला. तसेच हातावर कोयता मारून फिर्यादीला गंभीर जखमी केले, कोयता मारून मोबाईल फोडला, असे फिर्यादीत नमूद आहे.