शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
3
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
4
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
5
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
6
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
7
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
8
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
9
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
10
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
11
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
12
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
13
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
14
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
15
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
16
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
17
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
18
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
19
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
20
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

पादचाऱ्याकडील ऐवज लुटून केली लोखंडी गजाने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 4:35 PM

पादचाऱ्याकडील ऐवज लुटून लोखंडी गजाने मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

पिंपरी : पादचाऱ्याकडील ऐवज लुटून लोखंडी गजाने मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना निगडी येथे बुधवारी रात्री आठच्या सुमारास घडली. जुबेर शेख, फिरोज डंके, सचिन थोरात, बाळा कोंढाळकर (सर्व रा. यमुनानगर, निगडी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी राजु गणपत उबाळे (वय ४०, रा. अण्णाभाऊ साठेनगर, पीसीएमसी वसाहत, ओटास्कीम निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बुधवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास उबाळे हे त्यांचे मित्र गणेशन यांच्यासोबत पुणे-मुंबई भाडे केल्याची पोहोचपावती देण्यासाठी निगडीतील ट्रान्सपोर्टनगर येथे पायी जात होते. त्यावेळी काळभोर यांच्या हॉटेलच्या पाठीमागून रस्ता ओलांडत असताना आरोपींनी त्यांना रस्त्यात अडविले. त्यांच्याकडील मोबाईल व रोकड असा बारा हजारांचा ऐवज लुटुन त्यांना लोखंडी गजाने तसेच दगडाने मारहाण केली. त्यानंतर तेथून पसार झाले. या घटनेत उबाळे जखमी झाले. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस