शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

Ashadhi Wari 2025 : जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या ३४० पालखी सोहळ्याची सुरुवात

By विश्वास मोरे | Updated: June 18, 2025 17:51 IST

वरूणांचा अभिषेक, टाळ-मृदंगे, वीणा झंकारती, तुकोबांच्या अंगणी वैष्णव नाचती!

देहूगाव : टाळ-मृदंग वाजती, वीणा झंकारती, वरूणराजाचा अभिषेक होऊनी,  तुकोबांच्या अंगणी वैष्णव नाचती, अशी अपूर्व अनुभूती इंद्रायणी तीरावरील देहूनगरीत आली. वैष्णवांच्या अभूतपूर्व उत्साहात संतश्रेष्ठ जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या ३४० पालखी सोहळ्याने आषाढीवारीसाठी श्रीश्रेत्र देहूगाव येथून भूवैकुंठ पंढरीकडे बुधवारी सायंकाळी प्रस्थान ठेवले. "होय, होय वारकरी, पाहे पाहे पंढरी...' अशी विठूरायाच्या भेटीची आर्तता वैष्णवांठायी दिसून आली.यंदा जोरदार पावसाचे आगमन झाल्याने आषाढीवारीस येणाºया वैष्णवांचा उत्साह अपूर्व होता. देहूनगरीत आज भक्ती चैतन्याचे पसरले होते. इंद्रायणीला तर पाण्याबरोबरच भक्तीचा महापूर आला होता. आषाढीवारीसाठी मंगळवारी सांयकाळीच महाराष्ट्राच्या कानाकोपºयातून दिंडेकरी, दिंड्या, फडकरी, वारकरी देहूनगरीत दाखल झाले होते. त्यामुळे इंद्रायणी हरीभजन आणि भक्तीरसाने न्हाहून निघाली. पालखी प्रस्थान सोहळा आज असल्याने भल्या सकाळीच वारकºयांनी इंद्रायणी स्रान केले. सकाळपासूनच आज वातावरण ढगाळ होते. तर अधून-मधून पावसाच्या हलक्या सरी बसरत होत्या.प्रस्थान सोहळ्याच्या परंपरेनुसार पहाटे पाचला श्री विठ्ठल रुक्मीणी मंदिरात व शीळा मंदिरात संस्थानच्या वतीने महापूजा झाली. त्यानंतर सकाळी साडेसहा वाजता तपोनिधी पालखी सोहळ्याचे जनक नारायण महाराजांच्या समाधिची व सात वाजता वैंकुठगमण मंदिरात महापूजा संस्थानचे विश्वस्थांच्या हस्ते झाली. मंदिर सजविले मोहक पुष्पांनी कडेकोट बंदोबस्तसकाळपासूनच मुख्यमंदिरात दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. तर संपूर्ण मंदिर परिसर सुगंधी फुलांनी सजविला होता. मंदिरपरिसरात कडेकाट बंदोबस्त ठेवला होता. सकाळी आठला पाथरुडकर दिंडी व  म्हसलेकर मंडळींनी महाराजांच्या पादुका डोक्यावर घेऊन घोडेकर सराफ यांच्या घरी पादुकांना चकाकी देण्यासाठी नेल्या. तिथेच पाद्यपुजा अभंगारती झाली. त्यानंतर पादुका इनामदार वाड्यात आणण्यात आल्या. इनामदारवाड्यात  पादुकांची महापूजा झाली. त्यानंतर पालखीचे मानकरी म्हसलेकर मंडळींनी टाळ मृदंगाचा निनाद करीत मुख्यमंदिरातील वीणामंडपात आणल्या. आज दर्शनबारीचे नियोजनही नेटके झाले होते. सकाळी दहाला काल्याचे किर्तन झाले. पावसाळी वातावरणामुळे आज सूर्यनारायणाचे दर्शन झाले नाही. मात्र,  मुख्य मंदिरात वैष्णवांची गर्दी होऊ लागली.  उन सावल्यांचा, तर तुकोबांच्या अंगणी वैष्णवांनी खेळ मांडलाउन सावल्यांचा खेळ सुरू झाला. प्रस्थानाची वेळ समिप येऊ लागल्याने मुख्यमंदिरात दिंड्या जागा घेऊ लागल्या. आसमंती भगव्या पताका फडकावीत वैष्णवांची पावले मंदिराच्या दिशेने पडू लागली. प्रत्येकाच्या चेहºयावर वेगळेच चैतन्य होते. अडीचच्या सुमारास प्रस्थान सोहळ्यास सुरूवात झाली. सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री अजित पवार, खासदार श्रीरंग बारणे, सुनेत्रा पवार, आमदार महेश लांडगे, सुनील शेळके, अमित गोरखे,  शंकर जगताप, उमा खापरे, माजी मंत्री बाळा भेगडे आदी उपस्थित होते.दुसरीकडे मंदिर आवारात मानाचे अश्व दाखल झाले तर देहूकर दिंडीने ‘ज्ञानोबा तुकाराम’ या तालावर टाळ मृदंग-कल्लोळ आणि वीणेचा झंकार करायला सुरूवात केली. दुसरीकडे वीणामंडपात महापूजा झाली. देहू संस्थानाच्या वतीने मानकºयांचा आणि दिंडेकºयांचा सन्मान केला. नभांगणी उन सावल्यांचा, तर तुकोबांच्या अंगणी वैष्णवांनी खेळ मांडल्याचे दिसून आले. तसेच मुख्यमंत्र्यांनी आमदारांबरोबर फुगडी खेळली. अन् वरूणांचाही अभिषेकसव्वाचारच्या सुमारास ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल... असा जयघोष करीत देहूतील तरूणांनी पालखी खांद्यावर घेतली. वीणा मंडपातून अपूर्व उत्साहात पालखी बाहेर पडली. आणि पावसाला जोरदार सुरुवात झाली. जोरदार पावसातही वैष्णवांचा उत्साह तसुरभरही  कमी झाला नव्हता. त्यानंतर मंदिरप्रदिक्षिणा करून पालखी मुख्यमंदिरातून बाहेर आली. सोहळा पंढरीकडे मार्गस्त झाला. त्यानंतर पालखी आजोळघरी इनामदारवाड्यात विसावली. गुरुवारी सकाळी सोहळा पंढरीच्या वाटेवर मार्गस्त होणार आहे.

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५Maharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेPandharpur Wariपंढरपूर वारीPandharpurपंढरपूर