शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "अच्छे दिन येणार, मोदीजी जाणार; पंतप्रधान म्हणून..."; अरविंद केजरीवालांचं मोठं विधान
2
“जितेंद्र आव्हाडांना मानसोपचाराची गरज, कारवाई झाल्याशिवाय सुधारणार नाहीत”: वसंत मोरे
3
Pune Porsche Accident : अपहरण, दबाव, पैशांच्या जोरावर पोर्शे कार अपघाताची थेरी बदलण्याचा कट; 'तो' फोन उलगडणार गुपितं
4
चिंताजनक! मेंदू, हृदयावरच नाही तर किडनीवरही होतोय उष्णतेचा वाईट परिणाम; 'असा' करा बचाव
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; TATA Steel घसरला, बँकांची चमक वाढली
6
'बिग बॉस 17' विजेता मुनव्वर फारुकीचा दुसऱ्या पत्नीसोबत फोटो व्हायरल, कोण आहे ही सुंदरी?
7
महात्मा गांधी म्हणजे सूर्य, शाखेत जाणाऱ्यांचे प्रमाणपत्र नको; राहुल गांधींचे PM मोदींना उत्तर
8
प्रसाद ओकच्या एन्ट्रीने बॉलिवूडमध्ये उडणार 'धुरळा'; मौनी रॉयसोबत शेअर करणार स्क्रीन
9
विशेष लेख: २२०च्या आत? २५० ते २६०, की ३०० ते ३५०? भाजपाला नक्की 'किती' मिळतील?
10
यंदाची 'पंचायत' थोडी भावुक, डोळ्यात पाणी आणणारे सीन्स अन् बरंच काही....वाचा Panchayat 3 चा Review
11
Post Office: पोस्टात गुंतवणूक करताय? 'या' स्कीममध्ये मिळेल ७९५६४ रुपयांचं फक्त व्याज; पाहा डिटेल्स
12
आजचे राशीभविष्य - 30 मे 2024; आजचा दिवस शुभ फलदायी, मित्रांकडून लाभ होतील, अचानक धनलाभ संभवतो
13
"तुम्हाला नोकरीवरुन काढून टाकू.," Raghuram Rajan यांना कोण देत होतं धमकी; नंतर RBI गव्हर्नरांनी काय केलं?
14
‘बाळा’चे बदललेले रक्त बाईचे की आईचे? चाैकशी समितीने सादर केलेल्या अहवालाने खळबळ
15
स्वामीपूजन, आरती झाल्यावर आवर्जून म्हणा ‘स्वामी समर्थ मंत्र पुष्पांजली’; होईल स्वामीकृपा!
16
तुमची बर्थडेट ‘या’ ३ पैकी आहे? जून महिन्यात ठरतील लकी, लाभेल सुख-समृद्धी, पद-पैसा वृद्धी!
17
अन्वयार्थ विशेष लेख: वाघ बघितलाच पाहिजे आणि तो पण जवळून; हा कसला हट्ट?
18
अग्रलेख: कळ्या-फुलांचा ‘बाजार’! बेपत्ता बालकांमध्ये मुलींच्या प्रमाणात दरवर्षी वाढ
19
सेन्सरच्या त्रुटींमुळे दिल्लीत ५२° तापमानाचा ‘विक्रम’; हवामान विभाग म्हणे- पारा ४६.८° सेल्सिअसच
20
वीकएण्डचा वाजणार बोऱ्या! मध्य रेल्वेवर उद्यापासून तीन दिवस जम्बो ब्लॉक, ९३० फेऱ्या रद्द

उद्याेगनगरीत उत्साहात गणरायाचे आगमन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 8:19 PM

उद्याेगनगरी अशी ख्याती असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये गणशाचे उत्साहात अागमन झाले.

पिंपरी :  गणपती बाप्पा मोरया..., मंगलमूर्ती मोरया... असा जयघोष करीत, ढोल ताशांच्या निनादात, विघ्नहर्त्या गजाननाचे अर्थात लाडक्या गणपती बाप्पांचे उद्योगनगरीत गुरूवारी आगमन झाले. पारंपरिक वाद्यांचा वापर, गुलाल विरहित आणि पर्यावरण पूरक गणशोत्सवावर भाविकांनी भर दिला आहे. 

      राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविणारा उत्सव म्हणजेच गणेशोत्सव. कामगार कष्टकऱ्यांची नगरी असणाऱ्या पिंपरी-चिंचवड नगरीचा नूर काही औरच होता. गेल्या महिनाभरापासून सुरू असणारी उत्कंठा संपली. आज सकाळपासूनच उद्योगनगरी गणेशमय झाली होती. गणरायाची महती सांगणारी गीते कानावर पडत होती. त्यामुळे शहरातील वातावरण दिवसभर मंगलमय असेच होते. प्राणप्रतिष्ठापनेसाठी आज पहाटे ब्राम्ह मुहूर्तापासून तर दुपारी दीड वाजेपर्यंत उत्तम मुहूर्त होता. त्यामुळे घरगुती उत्सवाची लगबग अगदी सकाळपासूनच सुरू होती. सजावट करण्यात आणि बाप्पाचे स्वागत करण्यात कुटुुंबं रंगल्याचे चित्र घरोघरी दिसत होते. पारंपरिक वेश परिधान करून भाविक गणरायाची मूर्ती घेऊन जाताना दिसत होते. ‘गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया....’ असा जयघोष कानी पडत होता. दुपारनंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी वाजत गाजत गणरायाला आणले आणि प्रतिष्ठापना केली. गुलाल विरहीत मिरवणूक आणि ढोल ताशा आणि पारंपरिक वाद्यांचा वापर अधिक प्रमाणावर दिसून आला. ढोल-ताशांच्या दणदणाटात बाप्पाचे स्वागत करण्यात अाले. सायंकाळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणरायाची प्रतिष्ठापना केली. तसेच काही मंडळांनी पहिल्याच दिवशी देखावे सुरू व्हावेत, यासाठी प्रयत्न केले. तसेच सजावटीतही कार्यकर्ते मग्न असल्याचे दिसून आले.  

फुलांची सजावट, थर्मोकोलचा वापर कमीघरगुती गणेशोत्सवासाठी मखरे वापरली जातात. मात्र, यंदाच्या गणेशोत्सवात प्लॅस्टिक आणि थर्मोकोलला बंदी असल्याने भाविकांनी फुलांची सजावट आणि विद्युत रोषणावर भर दिल्याचे दिसून आहे. थर्मोकोलची मखरे बाजारपेठेतून गायब झाल्याचे दिसून आले. तसेच प्लॉस्टिक ऐवजी कागदी फुलांचा वापर अधिक दिसून आला. तसेच कागदी मखरेही अधिक प्रमाणावर दिसून आली. त्यामुळे पर्यावरण पुरक उत्सवाचा वेगळाच रंग दिसून येत होता.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडGanesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Ganeshotsavगणेशोत्सवnewsबातम्या