शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत तडीपार गुंडाला ठोकल्या बेड्या; दोन पिस्तूलासहित पाच काडतुसे जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 18:50 IST

गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने सांगवी परिसरात ही कारवाई केली

ठळक मुद्देगुंडाच्या विरोधात खून, खुनाचा प्रयत्न, मारमारी असे एकूण पाच गुन्हे दाखल असल्याने त्याला दोन वर्षां करिता तडीपार केले होते

पिंपरी: पिंपरीत दहशत माजविणाऱ्या तडीपार गुंडाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून दोन पिस्तूल व पाच काडतूस जप्त करण्ह्यात आली आहेत. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने सांगवी परिसरात ही कारवाई केली. 

मोहम्मद उर्फ मम्या मेहबूब कोरबू (वय २३, रा. ओटास्कीम, निगडी), असे अटक केलेल्या तडीपार गुंडाचे नाव आहे. सहा महिन्यांपूर्वी रावण गॅंगच्या गुंडांनी आकाश दोडमणी या तरुणावर गोळीबार केला. त्याच्या पायावर गोळी लागली होती. दोडमणी हा कोरबू गॅंगचा सदस्य आहे. आपल्यावरही गोळीबार होऊ शकतो, या भीतीने मोहम्मद कोरबू यानेही पिस्तूल बाळगले होते.

खंडणी विरोधी पथकाकडून सांगवी परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी रेकॉर्डवरील तडीपार गुंड मोहम्मद कोरबू हा औंध ऊरो रुग्णालयाच्या मागील बाजूस थांबलेला आहे, अशी माहिती गस्तीवरील पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा लावून त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे एक पिस्तूल आणि तीन काडतुसे आढळून आली. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली. कोठडीत असताना एकूण ८१ हजार रुपये किमतीची दोन पिस्तूल व पाच काडतुसे त्याच्याकडून हस्तगत केली. आरोपी मोहम्मद कोरबू याच्या विरोधात खून, खुनाचा प्रयत्न, मारमारी असे एकूण पाच गुन्हे दाखल आहेत. त्याला ३१ ऑक्‍टोबर २०२० रोजी पासून दोन वर्षाकरीता तडीपार केले होते.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड