शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

लष्कराच्या दस्तऐवजांचे आता होणार डिजिटायझेशन

By admin | Updated: August 17, 2015 02:41 IST

संरक्षण विभागाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणारे देशातील दुसरे अर्काईव्हल युनिट अँड रीसर्च सेंटर (एयूआरसी) खडकी कँटोन्मेंट बोर्डाच्या परिसरात साकारत आहे

सर्वजीत बागनाईक, खडकीसंरक्षण विभागाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणारे देशातील दुसरे अर्काईव्हल युनिट अँड रीसर्च सेंटर (एयूआरसी) खडकी कँटोन्मेंट बोर्डाच्या परिसरात साकारत आहे. यामध्ये संरक्षण विभाग व कँटोन्मेंट बोर्डाच्या जमिनींसंदर्भातील महत्त्वपूर्ण दस्तऐवज डिजिटल व मायक्रो फिल्म्सच्या स्वरूपात ठेवण्यात येणार आहे. याचबरोबर संशोधन व प्रशिक्षणाची व्यवस्थाही येथे होणार आहे. संरक्षण विभागाच्या जमिनीबाबतची कागदपत्रे व अन्य महत्त्वपूर्ण गोष्टींची जपणूक यापूर्वी दिल्लीतील ‘एयूआरसी’द्वारे केली जात होती. त्याचप्रमाणे लष्कराच्या दक्षिण मुख्यालयांतर्गत येणाऱ्या १९ कँटोन्मेंट व रक्षा संपदा विभागाशी संबंधित कागदपत्रे ठेवण्यासाठी खडकीमध्ये हे केंद्र सुरू होणार आहे. सेंट इग्नाशिअस चर्चच्या समोर होत असलेल्या या केंद्राच्या बांधकामास मे २०१३ मध्ये सुरुवात झाली. या केंद्रामध्ये अतिशय संवेदनशील दस्तऐवज, दुर्मिळ कागदपत्रे व मायक्रो फिल्म्स ठेवण्यात येणार आहेत. या ठिकाणी लष्कराच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था असेल. बांधकाम व अन्य सर्व खर्च हा दक्षिण मुख्यालयाकडूनच केला जात आहे. केंद्राचे निम्म्याहून अधिक काम झाले असून, लवकरच ते पूर्ण होईल. या केंद्रासाठी खडकी कॅँटोन्मेंट बोर्डाचा परिसर निवडण्याचे कारण म्हणजे केंद्रासाठी आवश्यक जमीन बोर्डाकडे उपलब्ध होती. हे ठिकाण रहदारीपासून दूर आहे; तसेच येथे प्रशिक्षणार्थींना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. याबरोबर दक्षिण मुख्यालयाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठिकाण असल्याने खडकीची निवड केली आहे. दिल्ली व पुणे शहर हे वेगवेगळ्या भूकंपप्रवण क्षेत्रात येतात. त्यामुळे दिल्लीमध्ये जरी भूकंपामुळे ही कागदपत्रे नष्ट झाली, तरी खडकी केंद्रात ती सहज उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे संरक्षण विभागाला आवश्यकतेप्रसंगी ती उपलब्ध करून देण्याचा या केंद्राचा उद्देश असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.