कामांना मंजुरी; स्थायी समिती सभा, शहरातील रस्ते दुरुस्तीसह विविध कामे होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 09:39 IST2025-02-12T09:38:21+5:302025-02-12T09:39:48+5:30
डांबरीकरण करण्याच्या विषयासह विविध कामांना आयुक्त शेखर सिंह यांची मान्यता

कामांना मंजुरी; स्थायी समिती सभा, शहरातील रस्ते दुरुस्तीसह विविध कामे होणार
पिंपरी : महापालिकेच्या हद्दीत विविध ठिकाणी जलनिस्सारण नलिका टाकणे, जलनिस्सारणविषयक सुधारणाविषयक कामे करणे, पावसाळी पाण्याची लाइन टाकणे, रस्त्याची दुरुस्ती व हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्याच्या विषयासह विविध विषयांना आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे. पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृह येथे स्थायी समिती सभा आणि महापालिका सभा मंगळवारी (दि. ११) झाली.
जलनिस्सारणविषयक सुधारणा कामे...
चहोली व कासारवाडी मैलाशुद्धीकरण केंद्रांतर्गत चिखली, मोशी, प्रभाग क्र. ९ नेहरूनगर, अजमेरा सोसायटी परिसरात, कासारवाडी मैलाशुद्धीकरण केंद्रांतर्गत इंद्रायणीनगर सेक्टर क्र. १ ते १३ मधील लांडगेनगर, खंडेवसी परिसरात जलनिःसारणविषयक कामांना स्थायी समिती सभेत आयुक्तांनी मान्यता दिली.
या विषयांना बैठकीत मंजुरी...
पुणे-बंगळुरू महामार्गाच्या पूर्वेकडील वाकड, ताथवडे परिसर व इतर भागात पावसाळी पाण्याची लाइन टाकणे व स्थापत्यविषयक कामे करणे, बोपखेल येथील विविध ठिकाणी रस्ते डांबरीकरण करून सुधारणा करणे व विकसित करणे या विषयांना मंजुरी दिली.
सेक्टर नं. ४,६,९ येथील एमआयडीसी व इतर ठिकाणी रस्त्यांची दुरुस्ती करणे व हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करणे. तसेच मोरेवस्ती, चिंचेचा मळा परिसरात आवश्यक ठिकाणी नवीन ठिकाणी स्टॉर्म वॉटर लाइन टाकणे, शेलारवस्ती परिसरातील रस्ते.
महापालिकेच्या ताब्यात असलेले औद्योगिक परिसरातील रस्ते हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करणे आणि नवीन जलशुद्धीकरण केंद्र ते इंद्रायणी नदीपर्यंत नाला बांधण्यासंबंधीचे विषय