स्कूल बॅग फाटल्याचा राग, विद्यार्थ्याला चाकूने भोसकले; पिंपरीतील एका शाळेतील घटना

By नारायण बडगुजर | Updated: February 3, 2024 18:27 IST2024-02-03T18:27:02+5:302024-02-03T18:27:26+5:30

अल्पवयीन सहा मुलांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला...

Angry over school bag being torn, student stabbed; An incident at a school in Pimpri | स्कूल बॅग फाटल्याचा राग, विद्यार्थ्याला चाकूने भोसकले; पिंपरीतील एका शाळेतील घटना

स्कूल बॅग फाटल्याचा राग, विद्यार्थ्याला चाकूने भोसकले; पिंपरीतील एका शाळेतील घटना

पिंपरी : स्कूल बॅग ओढल्याने फाटली. त्यावरून एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याला चाकूने भोसकले. यात विद्यार्थी गंभीर जखमी झाला. पिंपरी येथे शाळेसमोरील रस्त्यावर गुरुवारी (दि. १) दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. गंभीर जखमी झालेल्या अल्पवयीन मुलाने याप्रकरणी शुक्रवारी (दि. २) पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अल्पवयीन सहा मुलांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या विधीसंघर्षित मुलांच्या नातेवाइकांना पोलिसांकडून समजपत्र देण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीतील एका शाळेतील नववी आणि दहावीतील विद्यार्थी शाळेच्या समोरील रस्त्यावरून जात होते. त्यावेळी एका विद्यार्थ्याने दुसऱ्याची स्कूल बॅग ओढली. त्यात बॅग फाटली. त्यातून त्यांच्यात बाचाबाची झाली. त्याचा राम मनात धरून एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने चाकूने पोटात भोसकले. यात मुलगा गंभीर जखमी झाला. तसेच इतर विद्यार्थ्यांनी जखमी मुलाला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

Web Title: Angry over school bag being torn, student stabbed; An incident at a school in Pimpri