शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आळंदी पोलिसांकडून तब्बल 'सव्वा लाखांची' शस्त्रे जप्त; बाळगल्याप्रकरणी सराईत गुन्हेगाराला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 11:33 IST

शस्त्र बाळगल्याप्रकरणी सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली. त्याच्याकडून चार पिस्तूल व चार जिवंत काडतुसे, असा एक लाख २२ हजारांचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.

ठळक मुद्देसराईत गुन्हेगाराकडून जप्त केलेल्या शस्त्रामध्ये चार पिस्तूल, काडतुसे यांचा समावेश

पिंपरी : बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली. त्याच्याकडून चार पिस्तूल व चार जिवंत काडतुसे, असा एक लाख २२ हजारांचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. आळंदी पोलिसांनी ही कारवाई केली.

सोमनाथ प्रकाश पाटोळे (वय २७, रा. सोळू, ता. खेड), असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्याच्या गुन्हे तपास पथकातील पोलीस कर्मचारी बाळासाहेब विष्णू खेडकर यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खेडकर हे गस्तीवर होते. आरोपी सोमनाथ पाटोळे हा सोळू गावात आला असून, तो पिस्तूल विक्रीचा व्यवसाय करीत आहे, अशी माहिती फिर्यादी खेडकर यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून गुरुवारी (दि. ७) सोळू गावातील आळंदी ते मरकळ रोडवरील दर्ग्याजवळ सापळा लावून सोमनाथ याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक लाख २२ हजार रुपये किंमतीची चार पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली.

आरोपी सोमनाथ याने हे पिस्टल विक्रीसाठी आणले असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. आरोपी सोमनाथ याला न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस उपनिरीक्षक ए. एन. गांगड तपास करीत आहेत. आरोपी सोमनाथ पाटोळे हा सराईत गुन्हेगार असून, त्याला एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. त्याच्या तडीपारीचा कालावधी जानेवारीमध्ये पूर्ण झाला. त्यानंतर तो खेड तालुक्यातील साळू येथे आला होता. आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, पोलीस हवालदार आर. एम. लोणकर, पोलीस नाईक बी. बी. सानप, पोलीस कर्मचारी बाळासाहेब खेडकर, एन. के. साळुंखे, के. सी. गर्जे, जी. व्ही. आढे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक