Pimpri Chinchwad Crime: आकुर्डीत घरात घुसून तलवारीने वार, एक गंभीर जखमी; दोघांना अटक
By नारायण बडगुजर | Updated: December 9, 2023 13:35 IST2023-12-09T13:34:53+5:302023-12-09T13:35:29+5:30
गुरुवारी (दि. ७) रात्री सव्वादहाच्या सुमारास मारहाणीची ही घटना घडली....

Pimpri Chinchwad Crime: आकुर्डीत घरात घुसून तलवारीने वार, एक गंभीर जखमी; दोघांना अटक
पिंपरी : घरात घुसून एकाला मारहाण केली. तुमको अभी छोडेंगे नही, तुमको मार डालेंगे असे म्हणत तलवारी सारख्या हत्याराने वार करून जखमी केले. याप्रकरणी दोघांना अटक केले. आकुर्डी येथील पंचतारानगर येथे गुरुवारी (दि. ७) रात्री सव्वादहाच्या सुमारास मारहाणीची ही घटना घडली.
शिवम दुबे उर्फ दुब्या, अमन पुजारी (दोघे रा. पंचतारानगर, आकुर्डी) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी तरुणीने शुक्रवारी (दि. ९) निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीचे वडील व बहिणी घरात असताना दुबे आणि पुजारी हे दोघे फिर्यादी तरुणीच्या घरात आले. कोणत्यातरी कारणावरून त्यांनी फिर्यादी तरुणीच्या वडिलांवर तलवारी सारख्या हत्याराने वार केले. तुमको अभी छोडेंगे नही, तुमको मार डालेंगे असे म्हणत मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादी तरुणीस चापटीने मारले, असे फिर्यादीत नमूद आहे.