शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचे दोन महिने संपले अद्याप रेनकोट नाही : महापालिका प्रशासनाची उदासिनता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2019 10:10 IST

महापालिकेमार्फत गणवेश, बूट, वह्या, रेनकोट असे शालेय साहित्य देण्यात येते. मात्र, यंदा शालेय साहित्य वाटपासंबंधीची निविदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला

ठळक मुद्देविद्यार्थी धरताहेत भर पावसात शाळेची वाट  निविदा प्रक्रिया वेळेवर उरकून विद्यार्थ्यांची सोय करणे महापालिका प्रशासनाची जबाबदारीगेल्या दोन आठवड्यांपासून शहरामध्ये मुसळधार पाऊस सुरू

पिंपरी : महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना यंदा प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शालेय साहित्य उशिराने मिळणार आहे. पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले आहेत. जून महिन्यामध्ये शाळा सुरू झाल्यावर पहिल्या आठवड्यामध्ये विद्यार्थ्यांना रेनकोट मिळणे अपेक्षित होते. मात्र ऑगस्ट उजाडला असूनही महापालिका शाळांमध्ये रेनकोट पोहोचले नाहीत.  महापालिकेच्या शाळा सुरू होऊन दीड महिना उलटला असून, शाळेतील विद्यार्थ्यांना शासनाकडून आलेल्या पुस्तकांचे वाटप झाले आहे. मात्र, महापालिकेमार्फत मिळणारे शालेय साहित्य विद्यार्थ्यांना अद्याप मिळू शकलेले नाही. दरवर्षी शाळा सुरू होताच महापालिकेमार्फत गणवेश, बूट, वह्या, रेनकोट असे शालेय साहित्य देण्यात येते. मात्र, यंदा शालेय साहित्य वाटपासंबंधीची निविदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. ही निविदा प्रक्रिया वेळेवर उरकून विद्यार्थ्यांची सोय करणे महापालिका प्रशासनाची जबाबदारी होती. मात्र याकडे सोईस्कररित्या दुर्लक्ष करण्यात आले आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून शहरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी त्यांना रेनकोट वाटप करणे आवश्यक होते. मात्र पावसाळ्याचे दोन महिने संपले असूनही महापालिका प्रशासनाची रेनकोट वाटप संथगतीने सुरू आहे. आतापर्यंत फक्त २० शाळांमध्ये रेनकोट वाटप झाले असल्याची माहिती महापालिकेच्या शिक्षण विभागाने दिली आहे.    महापालिकेच्या शाळेत गरीब, गरजू कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यामुळे त्यांना रेनकोट, बूट अशा प्रकारचे साहित्य वेळेवर मिळणे अपेक्षित असते. मात्र, प्रशासनाच्या लालफितीच्या कारभारात विद्यार्थ्यांकडे पाठ फिरवली जाते. शहरामध्ये मुसळधार पाऊस सुरू असूनही रेनकोट वाटप पूर्ण झाले नसल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे. .....................१०५ पैकी फक्त २० शाळांत रेनकोटशहरामध्ये महापालिकेच्या १०५ शाळा आहेत. आॅगस्ट महिना उजाडला असून, १०५ पैकी फक्त २० शाळांमधील विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले आहे. उरलेल्या ८५ शाळांमधील हजारो विद्यार्थी पावसामध्ये भिजत शाळेत जात आहेत. याचा विचार महापालिका प्रशासनाने गांभीयार्ने करणे आवश्यक आहे. ........................ह्यह्यशाळांमध्ये रेनकोट वाटप सुरू आहे. कामामध्ये गती आणून वाटप त्वरित पूर्ण केले जाईल.ह्णह्ण- ज्योत्सना शिंदे, प्रशासन अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSchoolशाळाStudentविद्यार्थीRainपाऊस