शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
3
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
4
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
5
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
6
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
7
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
8
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
9
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
10
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
11
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
12
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
14
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
15
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
16
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
17
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
20
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका

कोरोनाच्या संकटात एका तपानंतर राम - लक्ष्मणाची जोडी आली एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 10:19 IST

उद्योजक नाहर कुटुंब एकत्र आल्याचा नातेवाइकांना आनंद

ठळक मुद्देजीवन-मरणाच्या दारात असताना रक्ताच्या नात्याकडून मिळालेला मानसिक आधार त्यांना ‘प्राणवायू’सारखा महत्त्वाचा ठरला

हणमंत पाटील

पिंपरी: कोरोनाच्या संकटात मुले आई-वडिलांना स्वीकारत नाहीत. आधाराची गरज असताना अनेक जवळचे मित्र व नातेवाईक दूर जातात. मदत करावी लागेल म्हणून बोलणेही टाळतात. अशा नकारात्मक गोष्टी समोर येत असतानाही पुणेपिंपरी-चिंचवड येथील नाहर कुटुंबातील राम-लक्ष्मणाची जोडी याच कोरोनाच्या संकटात तब्बल एक तपानंतर एकत्र आल्याची सकारात्मक बाब समोर आली आहे.

पुण्यातील बिबवेवाडी येथे नाहर कुटुंबातील २३ सदस्य एकत्र राहतात. कुटुंबातील चार बहीण-भावंडे एकत्र लहानाचे मोठी झाली. त्यापैकी संजय नाहर हे उद्योग व्यावसायानिमित्ताने भोसरी येथे स्थलांतरित झाले. त्यांनी आपल्या लाडक्या भावाला म्हणजे राजेश यांनाही तिकडे येण्याचा आग्रह केला. राजेश यांना चाकण भागात कंपनी सुरू करण्यास प्रोत्साहन दिले. दोन्ही भाऊ अनेक वर्ष एकत्र असल्याने त्यांना ‘राम-लक्ष्मणा’ची जोडी म्हणून समाजात ओळखले जात होते. मात्र मुले मोठी झाल्यानंतर राजेश यांनी त्यांच्या शिक्षणासाठी पुन्हा पुण्यात परत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भाऊ आपल्यापासून दूर जात असल्याने संजय नाहर नाराज झाले. त्यानंतर दोघांमध्ये गैरसमज वाढत गेले. त्यामुळे एकमेकांशी बोलणे, भेटणे आणि काैटुंबिक सण-समारंभालाही एकत्र येणे बंद झाले. त्यानंतर संजय यांनीही पुण्यातील आई व इतर भावंडाकडे जाणे पूर्ण बंद केले.

दरम्यान, कुटुंबापासून एकाकी असलेल्या संजय यांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने गाठले. या काळात पुन्हा कुटुंबाची तीव्रतेने त्यांना आठवण येऊ लागली. आतापर्यंतचा सर्व प्रवास आठवू लागला. त्यामध्ये आपल्या काही चुकांमुळे आपल्या रक्ताचे नाते कसे दुरावले. आपण या संकटातून वाचू शकलो, नाही तर आपल्याला भगवान महावीर माफ करणार नाहीत. अशी तीव्र जाणीव महावीर जयंती दिवशी हॉस्पिटलमध्ये असताना त्यांना झाली. अन् घडलेही तसेच, तब्बल १२ वर्षे दुरावलेला त्याचा भाऊ राजेश कोणतीही कल्पना नसताना त्यांना आधार देण्यासाठी मुलांसह थेट हॉस्पिटलमध्ये सेवेसाठी आला. त्यावेळी संजय यांनाही आनंदाश्रू लपवता आले नाहीत. त्यानंतर ते बंधूंच्या मोबाईलवरून आईशी बोलले.

नात्याचा आधार प्राणवायूसारखा...

जीवन-मरणाच्या दारात असताना रक्ताच्या नात्याकडून मिळालेला मानसिक आधार त्यांना ‘प्राणवायू’सारखा महत्त्वाचा वाटला. त्यामुळे संजय यांनी लवकर कोरोनाच्या संकटावर मात केली. कोरोनाच्या संकटाने आम्हाला पुन्हा एकत्र आणल्याची भावना नाहर कुटुंबीयांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

कोरोनातून बरा झाल्यानंतर सर्वांची माफी मागून कुटुंबात पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला. माझ्या बंधूने कात्रज येथे बांधलेल्या माता मंदिरात एकत्र भेटण्याचा आम्ही निर्णय घेतला. केवळ भावाने बांधलेले मंदिर म्हणून मी त्या मंदिरात एकदाही गेलो नव्हतो. तेथे आम्ही एकत्र आलो. आता कायम एकत्र राहणार आहे. असे उद्योजक संजय नाहर यांनी सांगितले. 

आमचे पूर्वीपासून एकमेकांवर घट्ट प्रेम होते. मात्र, मी पुण्यात गेल्याने काही गैरसमज निर्माण झाले होते. कोरोनाच्या संकटात पुन्हा आम्ही एकमेकांच्या मदतीला धावून गेलो. संकटकाळात रक्ताचे नातेच एकमेकांच्या मदतीला येई शकते, हे सिद्ध झाले. आम्ही दोघे एकत्र आल्याने आनंदाने आमच्या ७५ वर्षांच्या आईचे आयुष्य आणखी वाढेल. तसेच देशभरातील पाच हजार नाहर बांधवाना एकत्र आणताना आपल्या सोबत आपलाच भाऊ नसल्याची माझ्या मनातील खंतही या भेटीने संपली.                                                                                       राजेश नाहर, अध्यक्ष, ऑल इंडिया नाहर परिवार, पुणे 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याSocialसामाजिकhospitalहॉस्पिटलbusinessव्यवसाय