शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
3
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांना भाजपाला इशारा
4
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
5
निवडणुकीच्या रणधुमाळीत एलपीजी सिलेंडर पुन्हा स्वस्त, किमतीमध्ये एवढी झाली घट
6
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
7
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
8
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
9
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
10
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
11
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
12
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
13
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
14
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
15
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
16
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
17
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
18
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
19
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
20
प्रज्ज्वलचे अश्लील व्हिडीओ कोणी लिक केले ?

‘अनधिकृत’विषयी प्रशासन अनभिज्ञ, पक्षपातीपणाचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 3:39 AM

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाच्या वतीने नवी सांगवीतील मधुबन सोसायटीत अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई करण्यात आली. कोणावर कारवाई झाली, याबाबत कार्यकारी अभियंत्यांना विचारले असता ते अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.

पिंपरी -  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाच्या वतीने नवी सांगवीतील मधुबन सोसायटीत अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई करण्यात आली. कोणावर कारवाई झाली, याबाबत कार्यकारी अभियंत्यांना विचारले असता ते अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. त्यामुळे अतिक्रमण विभागाच्या गोपनीय बांधकाम पाडापाडी मोहिमेची चर्चा महापालिकेत सुरू आहे.अनधिकृत बांधकामांचे विधेयक मंजूर करताना नव्याने बांधकामे होणार नाहीत, याबाबत महापालिकांनी उपाययोजना करावी, अशा सूचना राज्य सरकारने केल्या आहेत. सन २०१५पर्यंतच्या बांधकामांना संरक्षण दिले आहे. अनधिकृत बांधकामांना निर्बंध असतानाही महापालिका परिसरात सर्रासपणे बांधकामे सुरू आहेत, ही बांधकामे पाडताना महापालिका प्रशासन पक्षपातीपणा करीत असल्याचा आरोप राष्टÑवादी काँगे्रेसने केला होता.महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाच्या वतीने शहरातील टपºया, पत्र्याच्या शेड अशा छोट्या बांधकामांवर कारवाई सुरू आहे. नवी सांगवी परिसरात आज दुपारपासून अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू करण्यात आली. मधुबन सोसायटीतील १० गुंठे जागेवर ही पाच मजली इमारत असून, तिचे काम अनेक दिवसांपासून सुरू होते. सायंकाळपर्यंत ही कारवाई सुरू होती. एका बांधकाम व्यावसायिकाचे हे बांधकाम असल्याचे काही नागरिकांनी सांगितले.कोणत्याही प्रभागात अनधिकृत बांधकाम सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर अतिक्रमण विभागाचे अधिकारी घटनास्थळी जाऊन पाहणी करतात. सद्य:स्थितीची छायाचित्रे काढतात. त्यानंतर मालकाला बांधकाम काढून घेण्यासंदर्भात नोटीस देतात. पंधरा दिवसांचा वेळही देण्यात येतो. त्यानंतरही संबंधितांनी बांधकाम काढून न घेतल्यास अतिक्रमणविरोधी पथकाच्या वतीने कारवाईचा दिवस आणि वेळ निश्चित केली जाते. त्यानंतर नियोजित वेळेनुसार पोलीस बंदोबस्तात कारवाई केली जाते. तसेच जवळच्या पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हाही दाखल करण्यात येतो. एरवी कारवाईची माहिती देण्यासाठी अतिउत्सुक असणाºया महापालिका प्रशासनाकडून गोपनीयता का पाळली जात आहे, ही कारवाई राजकीय दबावातून असल्याची चर्चा आहे.कारवाईचे गौडबंगाल ?अनधिकृत बांधकामावरील कारवाईबाबत कार्यकारी अभियंता मनोज सेठीया यांना माहिती विचारली असता, मधुबन सोसायटीतील ही पाच मजली इमारत आहे. ती पाडण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. तर संबंधित बांधकाम कोणाचे, मालक कोण, याबाबत माहिती विचारली असता आम्हाला माहिती नाही. माहिती घेत आहोत’ असे उत्तर दिले. त्यामुळे महापालिकेच्या गोपनीय कारवाईबाबत महापालिका वर्तुळात चर्चा होती.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड