होर्डिंगविरोधात कारवाई, लोणावळा नगर परिषदेची धडक मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 00:01 IST2018-10-05T00:01:05+5:302018-10-05T00:01:33+5:30
कारवाई : लोणावळा नगर परिषदेतर्फे धडक मोहिमेंतर्गत शहर आणि परिसरातील बेकायदा होर्डिंगवर कारवाई करताना पथक.

होर्डिंगविरोधात कारवाई, लोणावळा नगर परिषदेची धडक मोहीम
लोणावळा : लोणावळा शहराच्या सौंदर्याला विद्रूप करणाऱ्या र्होडिंगच्या विरोधात लोणावळा नगर परिषदेने धडक कारवाई मोहीम सुरू केली आहे. महामार्गालगतचे २५ ते ३० मोठे र्होडिंग काढण्यात आले. निसर्गसंपदेने बहरलेल्या लोणावळा शहरातून जाणाºया मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग व द्रुतगती महामार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात जाहिरातीचे र्होडिंग लावले जात होते. नगर परिषदेचे अधिकारी व पदाधिकारी यांचेच र्होडिंग व्यावसायिकांसोबत असलेले आर्थिक लागेबांधे व त्यामधून चुकीच्या पद्धतीने दिलेल्या परवानग्या यामुळे दिवसागणिक शहराच्या विद्रूपीकरणात वाढ होऊ लागली होती. या र्होडिंगविरोधात वारंवार काही लोकप्रतिनिधी व संघटना यांनी आवाज उठविला होता. या पार्श्वभूमीवर लोणावळा नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेने या र्होडिंगविरोधात कारवाई करण्याचा ठराव व धोरण राबवीत ते र्होडिंग काढण्याकरिता निविदा पद्धतीने काम दिले आहे.
शहरात सध्या या जाहिरात र्होडिंगच्या विरोधात कारवाईची मोहीम सुरू झाली आहे. अनेक र्होडिंग बेकायदा असल्याचे समोर आले आहे. काही
परवान्यांची मुदत संपलेली असतानाही र्होडिंग व्यवसाय सुरू आहे. आता मात्र या र्होडिंगविरोधात धडक मोहीम सुरू केली असून, लोणावळा शहर र्होडिंगमुक्त करण्यात येणार आहे. काही र्होडिंग व्यावसायिकांनी या कारवाईविरोधात तालुका न्यायालयातून स्थगिती मिळवली आहे. मात्र शहरे र्होडिंगमुक्त करा, असा उच्च न्यायालयाचा आदेश असल्याने या आदेशाचा आधार घेत सदर स्थगिती उठविण्याकरिता नगर परिषदेने हालचाली सुरू केल्या आहेत. येत्या काही दिवसांत लोणावळा शहर र्होडिंगमुक्त झाल्याचे पाहायला मिळणार आहे.
लोणावळा र्होडिंगमुक्त करणार
पर्यटननगरी अशी ओळख असलेल्या लोणावळा शहराला मोठमोठ्या र्होडिंगमुळे ग्रहण लागले होते. खंडाळा भागातील हिरवेगार डोंगर व व्हॅली या सौंदर्याला पर्यटकांना मुकावे लागत होते. शहरही विद्रूप होऊ लागले होते. याकरिता शहरात र्होडिंगविरोधात कारवाई सुरू करण्यात आली. शहरातील सर्व मोठी र्होडिंग काढण्यात येणार असल्याचे नगराध्यक्षा सुरेखा जाधव व मुख्याधिकारी सचिन पवार यांनी सांगितले.
या कारवाईचे विविध स्तरांतून स्वागत होत आहे. कारवाईत कोणताही पक्षपातीपणा होऊ नये, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. नगर परिषदेप्रमाणेच महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने अपघातांना कारणीभूत ठरत असलेले महामार्गालगतचे बेकायदा र्होडिंग काढून टाकावेत, अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.