पाेलीस काेठडीत असलेल्या महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 19:21 IST2019-09-22T19:20:45+5:302019-09-22T19:21:44+5:30
पाेलीस काेठडीत असलेल्या महिलेला चक्कर आल्याने रुग्णालयात दाखल केले असता तेथे त्या महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला.

पाेलीस काेठडीत असलेल्या महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न
पिंपरी : पोलीस कोठडीत असलेल्या महिला आरोपीला चक्कर आल्याने उपचारासाठी महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे आरोपी महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. पिंपरी येथे शनिवारी (दि. २१) दुपारी दीड वाजताच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोझी अॅलन रॉड्रक्स उर्फ रोझी फर्नांडीस (वय ३४, रा. कासारवाडी) असे आरोपी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस कर्मचारी मनीषा सुदर्शन जाधव यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
भोसरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यानुसार आरोपी महिला रोझी हिला अटक करण्यात येऊन न्यायालयाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडीत असताना चक्कर आल्याने तिला उपचारासाठी महापालिकेच्या पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी उपचारा दरम्यान टेबलवर ठेवलेले डॉक्टरांचे सर्जिकल ब्लेड घेऊन स्वत:च्या गळ्यावर मारून आरोपी रोझी हिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.