लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव दाभाडे : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तेरावर्षीय शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी कल्पेश प्रभाकर घरत (वय ३०, रा. रायगड) याला मोठ्या शिताफीने सोमवारी रात्री रायगड येथून अटक केली. आरोपीला मंगळवारी पुणे येथील जिल्हा विशेष सत्र न्यायालयात हजर केले असता, दि. १८ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कल्पेश घरत याने १७ जून रोजी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने शाळेत जाणाऱ्या मुलीला जवळ बोलावून मोटारीमध्ये तिचा विनयभंग केला. त्यामुळे ती मुलगी चांगलीच घाबरली व तेथून पळाली. घाबरलेल्या अवस्थेत तिने कारचा क्रमांकही नीट घेतला नव्हता. विनयभंगाबाबत येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलीस निरीक्षक मुगुटराव पाटील यांनी तपासाची सूत्रे वेगाने हलविली. पोलिसांनी पीडित मुलीकडून मिळालेल्या अर्धवट गाडी क्रमांकावरून आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. वाहतूक पोलिसांच्या मदतीने संबंधित क्रमांकाच्या गाड्यांची तपासणी सुरूकेली.
आरोपीला रायगडमधून अटक
By admin | Updated: July 5, 2017 03:03 IST