पिस्तुल बाळगल्याप्रकरणी सांगवीत आरोपीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 16:42 IST2018-11-19T16:37:49+5:302018-11-19T16:42:18+5:30
बेकायदा पिस्तुल बाळगल्याप्रकरणी सांवगी पोलिसांनी इसाक रज्जाक शेख या आरोपीला अटक केली आहे. ही घटना रविवारी सांयकाळी ११ च्या सुमारास घडली.

पिस्तुल बाळगल्याप्रकरणी सांगवीत आरोपीला अटक
पिंपरी : बेकायदा पिस्तुल बाळगल्याप्रकरणी सांवगी पोलिसांनी इसाक रज्जाक शेख या आरोपीला अटक केली आहे. ही घटना रविवारी सांयकाळी ११ च्या सुमारास घडली. बेकायदा शस्त्र बाळगण्यास प्रतिबंध करण्यात आले असताना, या आदेशाचा आरोपीने भंग केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरव येथील रस्त्यावर २६ हजार रुपए किंमतीचा गावठी कट्टा तसेच जिवंत काडतुसे घेऊन वावरत होता. याबाबतची माहिती सांगवी पोलिसांना मिळाली. सांगवी पोलिसांनी इसाक शेख (वय २५, मोरया पार्क गल्ली) या आरोपीला पोलिसांनी शिताफिने ताब्यात घेतले. शहरात बेकायदा पिस्तुल बाळगणारे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. परराज्यातून आणलेले पिस्तुल सर्रासपणे शहरात विक्री होत आहेत. पिस्तुल विक्री करणाºया टोळला जेरबंद करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले पाहिजेत. असे नागरिकांचे म्हणणे आहे