शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

मित्रावर गोळीबार करुन फरार झालेला आरोपी 24 तासात जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 10:11 PM

मित्रावर गाेळीबार करुन पसार झालेल्या आराेपीला पाेलिसांनी 24 तासाच्या आत शाेधून अटक केली आहे.

लोणावळा : किरकोळ कारणावरुन जिवाभावाच्या मित्रावर गोळीबार करुन फरार झालेल्या आरोपीला लोणावळा ग्रामीण पोलीसांनी 24 तासाच्या आत शोध घेत जेरबंद केले. लोणावळ्याजवळील वेहेरगाव याठिकाणी सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास गोळीबारीची ही घटना घडली होती. सोमवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास मंथन अशोक सातकर, हर्षद बाळासाहेब वाघमारे, समिर सुरेश शिरसठ (रा. नांगरगाव) व दिनेश शिंदे (रा. कामशेत, मावळ) हे चौघे मित्र मंथन यांचे मामा चंद्रकांत देवकर यांच्या देखरेखेखाली असलेला दहिवली वेहरेगाव येथिल तुरे बंगल्यावर गेले होते. रात्री नऊच्या सुमारास जेवण करुन तिसर्‍या मजल्यावरील खोलीत आराम करत असताना रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास मंथन व दिनेश शिंदे यांच्यात काहीतरी कारणावरुन वाद झाला, यावेळी मंथन हा दरवाजाकडे जात असताना दिनेश यांने त्याच्याकडील पिस्तूलमधून मंथनवर प्राणघातक हल्ला करत त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न गेला. यावेळी गोळी मंथनच्या डाव्या हाताच्या खांद्यावर लागली. घटनेनंतर दिनेश शिंदे याने घटनास्थळावरुन पळ काढला. घटनेची माहिती समजताच लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दीपक लुकडे, वडगाव मावळचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, कामशेतचे पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळाकडे धाव घेत आरोपीचा शोध सुरु केला आहे. दरम्यान पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधिक्षक विवेक पाटील हे दिवसभर या प्रकरणाचा आढावा घेतला. आज रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास फरार शिंदेला अटक करण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिस