बेकायदा पिस्तुल बाळगल्याप्रकरणी आरोपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 13:58 IST2019-01-17T13:57:11+5:302019-01-17T13:58:26+5:30
बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी निगडी येथे बुधवारी पोलिसांनी अविनाश भिमशा शिंगे (रा. ओटास्किम, निगडी) यास अटक केली आहे.

बेकायदा पिस्तुल बाळगल्याप्रकरणी आरोपीस अटक
पिंपरी : बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी निगडी येथे बुधवारी पोलिसांनी अविनाश भिमशा शिंगे (रा. ओटास्किम, निगडी) यास अटक केली आहे. बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी निगडी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याकडून ६६ हजार रुपये किमतीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मिलिंदनगर ओटास्किम, निगडी येथे राहणारा आरोपी अविनाश हा त्रिवेणीनगर चौकात पिस्तूल घेऊन आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सापळा रचून पोलिसांनी आरोपीला पिस्तूल, तसेच दोन जिवंत काडतुसे अशा मुद्देमालासह अटक केली आहे. चिखली पोलीस अधिक तपास करीत आहेत.