मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर अपघात, दोन जण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2018 22:36 IST2018-01-23T22:29:08+5:302018-01-23T22:36:23+5:30
मुंबई - पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वरसोली टोलनाक्याजवळ इनोव्हा मोटार व दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन जण गंभीर जखमी झाले. या अपघातात दुचाकी गाडीने पेट घेतल्याने गाडी जागीच जळून खाक झाली.

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर अपघात, दोन जण गंभीर जखमी
लोणावळा : मुंबई - पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वरसोली टोलनाक्याजवळ इनोव्हा मोटार व दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन जण गंभीर जखमी झाले. या अपघातात दुचाकी गाडीने पेट घेतल्याने गाडी जागीच जळून खाक झाली.
आज मंगळवारी रात्री 9.35 वाजता हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईच्या दिशेने दुचाकी गाडी येत असताना वरसोली टोलनाक्यापासून पाचशे मीटर अंतरावर असलेल्या छेद रस्त्यावरुन इनोव्हा गाडीने (एमएच 12 केएन 3461) अचानक यु टर्न घेतल्याने भरधाव वेगातील दुचाकी या इनोव्हा गाडीला धडकली. यामध्ये दुचाकी गाडीने लागलीच पेट घेतला. सुदैवाने अपघात होताच दुचाकीवरील दोन्ही युवक बाजुला फेकले गेल्याने बचावले. मात्र त्यांना पायाला व तोंडाला जबर मार लागला आहे. स्थानिक नागरिकांनी खाजगी वाहन व रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना उपचाराकरिता रवाना केले. तर आयआरबीच्या अग्नीशमन दलाने दुचाकी विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र सदर गाडी पुर्णतः जळून खाक झाली. अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावर जवळपास अर्धा ते पाऊण तास वाहतूक कोंडी झाली होती.