खड्यामुळे महिलेचा गेला जीव : चिंचवडमधील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 13:25 IST2018-07-06T12:51:37+5:302018-07-06T13:25:52+5:30
महिला दुचाकी वरून जात असताना रस्त्यात असलेला खड्डा चुकविताना त्यांची दुचाकी घसरली. त्यातच महिला बसच्या मागील चाकाखाली सापडल्याने तिचा मृत्य झाला

खड्यामुळे महिलेचा गेला जीव : चिंचवडमधील घटना
चिंचवड : अंदाज न आल्याने खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वार महिला बसच्या चाकाखाली गेल्याने तिचा मृत्य झाला.ही दुर्दैवी घटना चिंचवडमधील अहिंसा चौकात सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहिती नुसार पीएमपीएमएलची बस (एम एच १२ क्यु जी १६६३) चिंचवड गावाकडून चिंचवड स्टेशनकडे जात होती. याच दिशेने एक महिला दुचाकी वरून जात असताना रस्त्यात असलेला खड्डा चुकविताना त्यांची दुचाकी घसरली. त्यातच महिला बसच्या मागील चाकाखाली सापडल्याने तिचा मृत्य झाला.या घटनेत मृत झालेल्या महिलेचे नाव देसाई (पुर्ण नाव समजु शकले नाही)असे असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
अत्यंत वर्दळीचा असणाऱ्या या चौकात वारंवार छोटे-मोठे अपघात होत असतात.या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा भागात सम-विषम पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र याचे पालन होत नसल्याने वाहने मनमानी पद्धतीने रस्त्यावर उभी केली जातात.आज घडलेल्या अपघाता वेळी रस्त्यावर अनेक चारचाकी व दुचाकी वाहने लावण्यात आली होती.यामुळे हा रस्ता अरुंद झाला होता.दुचाकी वरील महिलेला या समस्येमुळे रस्ता मिळाला नाही.रस्त्याच्या मधोमध असणारा खड्डा व रस्त्यात उभ्या असणाऱ्या वाहनांमुळे हा अपघात झाल्याचे प्रत्यक्ष दर्शींनी सांगितले.घटनास्थळी चिंचवड पोलीस व वाहतूक शाखेचे कर्मचारी उपस्थित होते.या अपघातानंतर काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती.पुढील तपास चिंचवड पोलीस करत आहेत.