Maharashtra Election 2019 : पिंपरी राष्ट्रवादीकडून दोन उमेदवारांना 'एबी' फॉर्म ? मीच अधिकृत उमेदवार : सुलक्षणा शीलवंत- धर यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 13:36 IST2019-10-04T13:25:35+5:302019-10-04T13:36:59+5:30
शुक्रवारी शेवटच्या दिवशी माजी आमदार अण्णा बनसोडे यांनी एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज दाखल करत राष्ट्रवादीची उमेदवारी आपल्याला मिळाल्याचे सांगितले...

Maharashtra Election 2019 : पिंपरी राष्ट्रवादीकडून दोन उमेदवारांना 'एबी' फॉर्म ? मीच अधिकृत उमेदवार : सुलक्षणा शीलवंत- धर यांचा दावा
पिंपरी : पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या सहीचा एबी फॉर्म माज्याकडे आहे. त्या फॉर्मसह मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची मीच अधिकृत उमेदवार आहे, असा दावा सुलक्षणा शीलवंत -धर यांनी केला आहे. शुक्रवारी शेवटच्या दिवशी माजी आमदार अण्णा बनसोडे यांनी एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज दाखल करत राष्ट्रवादीची उमेदवारी आपल्याला मिळाल्याचे सांगितले. त्यानंतर काही वेळातच सुलक्षणा शीलवंत धर यांनीही राष्ट्रवादीकडून उमेदवारी दाखल केली. त्यामुळे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते गोंधळल्याचे दिसून आले.
राखीव असलेल्या पिंपरी मतदार संघात गुरुवारी राष्ट्रवादी तर्फे सुलक्षणा धर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तसेच त्यांना एबी फॉर्मही देण्यात आला. त्यामुळे पक्षातील इच्छुक माजी आमदार अण्णा बनसोडे व शेखर ओहाळ यांनी नाराजी व्यक्त करीत अपक्ष लढण्याचा इशारा दिला. त्यानंतर शुक्रवारी सकाळी अण्णा बनसोडे यांनी राष्ट्रवादीच्या एबी फॉर्म सह उमेदवारी अर्ज सादर केला. एका मतदार संघात दोन उमेदवारांना राष्ट्रवादीकडून एबी फॉर्म देण्यात आला त्यामुळे सामान यांसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते गोंधळ्याची दिसून आले. काही पदाधिका?्यांनी पक्षातील बड्या नेत्यांना फोनवरून संपर्क केला मात्र याबाबत समाधान कारक माहिती त्यांना मिळू शकली नाही.
...........