Pimpri Chinchwad: फोनवर शिवीगाळ का केली म्हणत तरुणाच्या पायावर चाकूने वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 11:49 IST2023-11-21T11:49:33+5:302023-11-21T11:49:49+5:30
पिंपरी : फोनवर शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणावर चाकूने वार केला. यात तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी (दि. ...

Pimpri Chinchwad: फोनवर शिवीगाळ का केली म्हणत तरुणाच्या पायावर चाकूने वार
पिंपरी : फोनवर शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणावर चाकूने वार केला. यात तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी (दि. १८) खेडमधील मेदनकरवाडीतील बोरजाईनगर येथे घडली. या प्रकरणी धीरज शिलिंग हाडवळे (वय २३, रा. बोरजाईनगर, मेदनकरवाडी, ता. खेड) यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी प्रीतेश सुनील चव्हाण याच्यासह एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धीरज हे त्यांच्या घरी असताना संशयित प्रीतेश याने फोन करून त्यांना इमारतीच्या खाली बोलावले. तिथे प्रीतेश आणि त्याचा अल्पवयीन साथीदार होते. अल्पवयीन मुलाने धीरज यांना ‘मला फोनवर शिवीगाळ का केली’, असे म्हणत मारहाण करण्यास सुरुवात केली.