शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
2
गौतम गंभीरवर बीसीसीआय नाराज, कसोटी हरल्यानंतर जे बोलला, ते खटकले... 
3
चीनच्या शेजारी देशाने प्रचंड सोने घेतले; एवढे महाग असले तरी..., जगातील सर्वात मोठा खरेदीदार ठरला
4
Thailand Flood : हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
5
भारताच्या अर्थव्यवस्थेची ताकद वाढली, दुसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी ८.२% वाढला
6
“प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन तपोवनातील वृक्ष तोडण्याचे कारण काय?”: उद्धव ठाकरे
7
विकला जाणार रतन टाटांचा व्हिला, खरेदीसाठी जुन्या मित्रानेच 'इंटरेस्ट' दाखवला; किती कोटी मोजणार?
8
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
9
सोलापूर बसस्थानावरील अस्वच्छतेबाबत आगार व्यवस्थापक निलंबित; प्रताप सरनाईकांचे आदेश
10
उफराटा...! ट्रम्प अमेरिकेत आयकर रद्द करणार, टेरिफ मधून आलेल्या पैशांवर भागवणार; घोडं काय, भाडं काय...
11
China Japan Tensions: जपान आणि चीनमध्ये तणाव वाढला, पंतप्रधानांचं विधान का ठरलं वादाचं कारण?
12
भूकंपासह अनेक मोठी संकट येणार, ज्वालामुखीचा उद्रेक, तीव्र हवामान बदल; बाबा वेंगाची २०२६ साठी भविष्यवाणी
13
बाजारात नफावसुलीचा जोर! एअरटेल-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये जोरदार घसरण; सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
14
बाल्कनीतून डोकावताना तोल गेला, तीन वर्षांचा चिमुकला खाली पडला...; नाशिकमधील घटना
15
भारताने रचण्यास सुरुवात केली 'इंद्रजाल'; पाकिस्तानने मग तुर्कीचा ड्रोन पाठवूदे नाहीतर चीनचा...
16
Sri Lanka Flood : पावसाचं थैमान! श्रीलंकेत भीषण पूर, ५६ जणांचा मृत्यू; ६० जण बेपत्ता, ६०० घरांचं मोठं नुकसान
17
"पैसा सर्वकाही नाही, मन मोठं हवं!"; कंपनीची १,००० कर्मचाऱ्यांसाठी फ्रीमध्ये थेट 'लंडन ट्रिप'
18
"ज्याच्यासाठी आमचं घर फुटलं, तोच माणूस माझ्याशी बेईमान झाला", धनंजय मुंडेंचा चढला पारा, प्रचारसभेत कोणावर 'वार'?
19
“शिवसेना–भाजप ही विचारधारेची युती, अशी युती..."; रवींद्र चव्हाणांना एकनाथ शिंदेंचे उत्तर
20
“३० वर्षांनी ‘मुंबई’चे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये”; राम नाईक यांनी विरोधकांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

निगडीत पीएमपीएमएल इलेक्ट्रिकल बसला अचानक आग; प्रवाशांचा थरकाप, चालकाच्या प्रसंगावधानाने सर्वजण सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 16:39 IST

चालकाने प्रसंगावधान ओळखून बसचे दरवाजे उघडले प्रवाशांनी तत्परतेने बस मधुन बाहेर पडत आपले जीव वाचवले

निगडी: मधुकर पावळे उड्डाणंपुल परिसरात दि.१० शुक्रवार रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास पीएमपीएमएलच्या इलेक्ट्रिकल बसला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी सुखरूप बाहेर काढण्यात आले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, 303 क्रमांकाची निगडी-आकुर्डी शटल इलेक्ट्रिकल बस ही मधुकर पवळे उड्डाणपुलाजवळून आकुर्डी रेल्वे स्टेशनकडे जात असताना अचानक बसच्या मागील भागातून धूर निघू लागला. काही क्षणांतच आगीचे लोट दिसू लागले. बसमध्ये प्रवासी असल्याने क्षणभर गोंधळ उडाला. प्रवाशांनी तत्परतेने खिडक्यांच्या काचा फोडून बस मधील  झालेला धुर बाहेर काढला. चालकाने प्रसंगावधान ओळखून बसचे दरवाजे उघडले प्रवाशांनी तत्परतेने  बस मधुन बाहेर पडत आपले जीव वाचवले. घटनेची माहिती मिळताच निगडी अग्निशमन दलाचे जवान आणि निगडी पोलीस ठाण्याचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवून मोठा अनर्थ टाळला.

घटनेनंतर बसच्या परिसरात मोठी गर्दी जमली होती. पोलीसांनी परिसर बंद करून वाहतूक सुरळीत केली. या घटनेमुळे स्थानिक प्रवासी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार, बसच्या इलेक्ट्रिकल सिस्टममधील शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, अचूक कारण पीएमपीएमएल प्रशासनाच्या तपासानंतर समोर येईल.

 

English
हिंदी सारांश
Web Title : PMPML Electric Bus Catches Fire in Nigdi; Passengers Safe

Web Summary : A PMPML electric bus caught fire near Nigdi, Pune. Passengers escaped unharmed thanks to the driver's quick thinking. Short circuit suspected as the cause. Firefighters quickly extinguished the blaze, averting a major incident.
टॅग्स :PuneपुणेnigdiनिगडीPMPMLपीएमपीएमएलBus DriverबसचालकFire Brigadeअग्निशमन दलpassengerप्रवासी