आळंदी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर रोहिंग्यांचे प्रमाण दिसून येते, हे रोहिंगे आले कोठून? आचार्य स्वामी गोविंदगिरी महाराज यांचा सवाल
By विश्वास मोरे | Updated: January 4, 2025 20:33 IST2025-01-04T20:30:16+5:302025-01-04T20:33:54+5:30
संत संवाद कार्यक्रमात आचार्य स्वामी गोविंदगिरी महाराज बोलत होते

आळंदी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर रोहिंग्यांचे प्रमाण दिसून येते, हे रोहिंगे आले कोठून? आचार्य स्वामी गोविंदगिरी महाराज यांचा सवाल
पिंपरी :महाराष्ट्र जागवा, महाराष्ट्र जागा ठेवा, उभा करा. महाराष्ट्र मेला, तर राष्ट्र मेले. महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले. महाराष्ट्र हा देशाचा आधार, असे मत आचार्य स्वामी गोविंदगिरी महाराजांनी शुक्रवारी रात्री आळंदीत व्यक्त केले. आळंदी-मोशी रस्त्यावरील वेदश्री तपोवन येथे आयोजित केलेल्या संत संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शांतिब्रह्म, वारकरी भूषण मारुती महाराज कुऱ्हेकर, भास्करगिरी महाराज, मंत्री राम शिंदे, पंकजा मुंडे, संत तुकाराम महाराज देवस्थानाचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थानाचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, आमदार महेश लांडगे, उमा खापरे, शंकर जगताप, अमित गोरखे आदी उपस्थित होते.
संप्रदायातील मान्यवरांचा सन्मान
यावेळेस संप्रदायातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी गोविंदगिरी महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपाची प्रतिकृती मुखमंत्र्यांना देऊन सत्कार करण्यात आला. मात्र, मुख्यमंत्र्यांनी डोक्यात शिवरायांचा जिरेटोप डोक्यात न घालता सन्मानपूर्वक नमन करून स्वीकारला.
आमची इंद्रायणी, चंद्रभागा प्रदूषण रोखायला हवे
गोविंदगिरी महाराज म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे मागण्या आहेत. आपल्याला मोठी संत परंपरा आहे, वारकऱ्यांच्या छोट्या अपेक्षा आहेत. हरितवारीची क्रांती करायची आहे. आमची इंद्रायणी, चंद्रभागा प्रदूषण रोखायला हवे, नदी हा स्वच्छ करायला हवी. आजचा तरुण ड्रक्सच्या अधीन होत आहे. त्याचे प्रमाण पंजाबमध्ये अधिक आहे, पंजाब पोखरला आहे. हे ड्रगचे लोन महाराष्ट्रात येऊ नये, यासाठी प्रयत्न करायला हवेत.
गोविंदगिरी महाराज म्हणाले, आळंदी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर रोहिंग्यांचे प्रमाण दिसून येते, हे रोहिंगे आले कोठून? त्यांना बाहेर कोण काढणार. त्यावरही नियंत्रण आणण्याची गरज आहे. तसेच मराठ्यांचा इतिहास, शिवरायांचा खरा इतिहास तरुणांपुढे आणण्याची गरज आहे. महाराष्ट्र जागविण्याचे आणि महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम व्हावे.
फेसाळलेल्या इंद्रायणीच्या पुनर्जन्माचा संकल्प
मुख्यमंत्री म्हणाले, ज्या प्रकारे गंगा नदी स्वच्छ केली जात आहे, त्याचप्रमाणे इंद्रायणी, गोदावरी, चंद्रभागा या नद्या स्वच्छ बनवण्यासाठी येत्या काळात पूर्ण क्षमतेने प्रयत्न केले जाईल. फेसाळलेल्या इंद्रायणीच्या पुनर्जन्माचा संकल्प आम्ही करू.