शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पवना, इंद्रायणी, मुळा नद्यांच्या पूररेषेत तब्बल अडीच हजार बांधकामांना नोटिसांचा फार्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 12:06 IST

सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली महापालिका प्रशासन अशा बांधकामांवर कारवाई करीत नाही. त्यामुळे दरवर्षी अतिक्रमणांमुळे पुराचा फटका नदीकाठच्या रहिवाशांना बसत आहे.

पिंपरी : चिखलीतील इंद्रायणी नदीच्या पूररेषेतील ३६ बंगले पिंपरी-चिंचवड महापालिकेने जमीनदोस्त केल्यानंतर शहरातील तिन्ही नदीच्या पूररेषेतील अनधिकृत बांधकामे, प्लॉटिंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राजकीय नेते, अधिकाऱ्यांच्या वरदहस्तानेच पूररेषेत आणि शहरात अनधिकृत बांधकामाचे पेव फुटल्याचे चित्र दिसत आहे. पूररेषेत तब्बल अडीच हजारांहून अधिक निवासी, व्यावसायिक बांधकामे आहेत. सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली महापालिका प्रशासन अशा बांधकामांवर कारवाई करीत नाही. त्यामुळे दरवर्षी अतिक्रमणांमुळे पुराचा फटका नदीकाठच्या रहिवाशांना बसत आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने गतवर्षीच्या पावसाळ्यानंतर पठना, इंद्रायणी आणि मुळा या तिन्ही नदी पात्रालगत आणि पूररेषेतील बांधकामे सर्वेक्षण केले. पूररेषेत धनदांडग्यांची निवासी, हॉटेल, फार्म हाऊस, फर्निचर दुकाने, नर्सरी, तसेच पत्राशेड, बांधकामे करून व्यावसायिकांना भाडचाने दिल्याचे आढळले. दरमहा त्यातून लाखो रुपयाचे भाडे वसूल करत आहेत. 

महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने केलेल्या सर्वेक्षणात अनधिकृत निवासी १ हजार ३०८, व्यावसायिक १ हजार १८२ तर मिश्र २७ अशी २ हजार ५१७ बांधकामे, पत्राशेड आढळली. ही बांधकामे, पत्राशेड असणाऱ्या जागा मालक, दुकानदारांना आठ महिन्यापूर्वीच अतिक्रमण कारवाईची नोटीस देण्यात आल्या. मात्र, विधानसभा निवडणुकीमुळे सत्ताधारी आमदारांच्या आग्रहाखातर महापालिका प्रशासनाने कोणतीच कारवाई केली नाही.शहरातील पतना आणि इंद्रायणी नद्यांच्या पात्रालगत अनेक ठिकाणी भराव, राडारोडा टाकून बेकायदेशीर प्लॉटिंग केले जात आहे. निळ्या पूररेषेत राजकीय मंडळी, बांधकाम व्यावसायिकांकडून बेकायदेशीर प्लॉटिंगची ओरदार विक्री होत आहे. यासाठी विविध ऑफर्स दिल्या जात आहेत. अशा ऑफर्सना बळी पडून नागरिक लाखो रुपये मोजून प्लॉट खरेदी करत आहेत. तुम्ही बांधकामे करा, आम्ही आहेत, अशी आश्वासने देत असल्यामुळे नागरिक निवासी आणि व्यावसायिक अनधिकृत बांधकामे करत आहेत. ही बांधकामे होताना महापालिका प्रशासन आणि नदीची जबाबदारी असलेले जलसंपदा विभागाचे अधिकारी याकडे 'अर्थपूर्ण' कानाडोळा करत असल्यामुळेच नदी पात्रात बांधकामांचे पेव वाढत असल्याचा आरोप होत आहे.

राजकीय आशीर्वादानेच नागरिकांची फसवणूक

पवना, इंद्रायणी नदी पात्रात पूररेषेत अनधिकृत प्लॉटिंग, निवासी व व्यावसायिक बांधकामे ही राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने सुरू आहेत. त्या ठिकाणी जागा घेणाऱ्या नागरिकांचे आर्थिक नुकसान करत फसवणूक केली जात आहे. परंतु, प्रत्यक्षात नदी पात्रालगत अनधिकृत प्लॉटिंग करणाऱ्यांबर राजकीय नेते, व्यावसायिकांवर पालिकेकडून कारवाई केली जात नसल्याचे चित्र आहे. 

शहरातून वाहणाऱ्या तिन्ही नद्यांच्या पूररेषेत २ हजार ५१७ अनधिकृत बांधकामे आहेत. या बांधकाम धारकांना यापूर्वीच नोटिसा बजावल्या आहेत. - मनोज लोणकर, उपायुक्त, अतिक्रमण निर्मूलन विभाग, पिंपरी महापालिका.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेReal Estateबांधकाम उद्योगMuncipal Corporationनगर पालिका