बालविवाहप्रकरणी पतीसह मुलीच्या आईवडिलांवर गुन्हा दाखल; मुलगी गरोदर राहिल्यानंतर प्रकार उघड

By नारायण बडगुजर | Updated: July 20, 2023 16:44 IST2023-07-20T16:43:38+5:302023-07-20T16:44:41+5:30

तिचा पती आणि आईवडिलांसह पाच जणांवर गुन्हा दाखल...

A case has been registered against the husband and the girl's parents in the case of child marriage | बालविवाहप्रकरणी पतीसह मुलीच्या आईवडिलांवर गुन्हा दाखल; मुलगी गरोदर राहिल्यानंतर प्रकार उघड

बालविवाहप्रकरणी पतीसह मुलीच्या आईवडिलांवर गुन्हा दाखल; मुलगी गरोदर राहिल्यानंतर प्रकार उघड

पिंपरी : नात्यातील अल्पवयीन मुलीशी लग्न केले. मुलगी गरोदर राहिल्याने बालविवाहाचा प्रकार समोर आला. याप्रकरणी तिचा पती आणि आईवडिलांसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला. पिंपरी परिसरात हा प्रकार घडला.

पीडित मुलीने याप्रकरणी बुधवारी (दि. १९) पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पीडित मुलीची आई, वडील, सासू, सासरे आणि पती यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १६ वर्षीय मुलीचा तिच्या नात्यातील तरुणासोबत विवाह करून दिला.

लग्नानंतर आरोपी पतीने पीडित मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यात मुलगी गरोदर राहिली. त्यानंतर तब्येत खराब झाल्याने पीडित मुलगी रुग्णालयात गेली. त्यावेळी ती दोन महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आले. त्यानुसार पीडित मुलीचा पती, आईवडीलांसह इतर आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पिंपरी पोलिस तपास करीत आहेत.

Web Title: A case has been registered against the husband and the girl's parents in the case of child marriage