झोपेत असताना पत्नीच्या डोक्यात घातला सिमेंटचा ब्लॉक; चिंचवडमधील घटना
By रोशन मोरे | Updated: August 21, 2023 13:55 IST2023-08-21T13:54:15+5:302023-08-21T13:55:02+5:30
ही घटना रविवारी (दि.२०) पहाटे साडेपाचच्या सुमारास गावडेचाळ, चिंचवड येथे घडली...

झोपेत असताना पत्नीच्या डोक्यात घातला सिमेंटचा ब्लॉक; चिंचवडमधील घटना
पिंपरी : घरगुती भांडणातून पत्नी झोपेत असताना तिच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॅक मारून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न पतीने केला. ही घटना रविवारी (दि.२०) पहाटे साडेपाचच्या सुमारास गावडेचाळ, चिंचवड येथे घडली. या प्रकरणी महिलेने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गणेश मोहन झोंबाडे (वय ४२, रा. गावडेचाळ, चिंचवड) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, फिर्यादी यांची बहिण आणि तिचा पती संशयित आरोपी गणेश यांच्यामध्ये शनिवारी (दि.१९) घरगुती कारणावरून भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून गणेश याने आपली पत्नी झोपेत असताना तिला जीवे मारण्याच्या उद्देशाने सिमेंटचा ब्लॅक मारुन तिला गंभीर जखमी केले, असे फिर्यादीत नमूद आहे.