शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

निगडी येथे वृद्ध महिलेला धाक दाखवून पळविला ४ लाख ३० हजारांचा ऐवज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 20:27 IST

फिर्यादी वृद्ध महिलेचा मुलगा नोकरीनिमित्त परदेशात वास्तव्यास आहे...

ठळक मुद्देपोलिसांनी दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात केला गुन्हा दाखल

पिंपरी : घरात एकट्या असलेल्या वृद्ध महिलेला धाक दाखवून धक्काबुक्की केली. त्यानंतर त्यांच्या अंगावरील तसेच घरातील दागिने व रोकड असा चार लाख ३० हजारांचा ऐवज चोरट्यांनीचोरून नेला. निगडी प्राधिकरण येथे सोमवारी (दि. १०) रात्री अकराच्या सुमारास हा प्रकार घडला.हेमलता मलगौडा पाटील (वय ७६, रा. पहिला मजला, गायत्री हेरीटेज, सेक्टर नंबर २४, प्राधिकरण निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हेमलता यांचा मुलगा नोकरीनिमित्त परदेशात वास्तव्यास आहे. तसेच त्यांची मुलगी व जावई सेक्टर २५ येथे राहतात. त्यामुळे हेमलता त्यांच्या घरात एकट्याच राहतात. सोमवारी रात्री साडेदहानंतर हेमलता टीव्ही पाहत होत्या. त्यावेळी त्यांच्या फ्लॅटच्या मागच्या बाजूचा दरवाजा उघडा होता. त्यामुळे त्यांच्या घरामागील गार्डनमधून पहिल्या मजल्यावर चढून दोन अनोळखी चोरटे मागच्या दरवाजातून हेमलता यांच्या घरात घुसले. त्यानंतर हेमलता यांना धाक दाखवून व धक्काबुक्की करून चोरट्यांनी त्यांच्या अंगावरील व घरातील दागिने तसेच रोकड असा चार लाख ३० हजारांचा ऐवज चोरून नेला.दोन्ही चोरटे चेहऱ्यावर मास्क बांधून आले होते. तसेच त्यांनी धक्काबुक्की केल्याने हेमलता घाबरल्या होत्या. त्यांच्यावर रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. याबबात माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आरोपींच्या शोधार्थ पोलिसांची पाच पथके रवाना करण्यात आली आहेत. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :nigdiनिगडीThiefचोरtheftचोरीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी