34 lakhs loss due to attraction of One lakh pounds | एक लाख पौंडाच्या लालसेपोटी ३४ लाख गमावले

एक लाख पौंडाच्या लालसेपोटी ३४ लाख गमावले

ठळक मुद्देपैसे जमा करून एक लाख पौंड जमा न करता तसेच जमा केलेले पैसे न देता फसवणूक

पिंपरी : सोशल मीडियावर ओळख करून विदेशात असल्याचे भासवले. विदेशातून हिंदुस्थानात येत असून एक लाख पौंड बँक खात्यात जमा करत असल्याचे सांगून थेरगाव येथील व्यक्तीकडून विविध खात्यांवर ३४ लाख रुपये पाठवण्यास सांगून फसवणूक केली. नोव्हेबर महिन्यात हा प्रकार थेरगाव येथे घडला.
वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय माधव शिंदे (वय ५८, रा. ग्रीन सोसायटी, थेरगाव) यांनी  फिर्याद दिली आहे. त्यानुसार, नेहा शर्मा (रा. गुरगाव), निखिल शर्मा (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ७ ते २५ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत घडला. हॉली नान्सी या महिलेने  दत्तात्रय यांच्याशी फेसबुकवर मैत्री केली. हॉली नान्सी या महिलेने ती हिंदुस्थानात येत असून तिने एक लाख पौंड सोबत आणले आहेत. ते पैसे दत्तात्रय यांच्या खात्यावर पाठवायचे आहेत. संगीता शर्मा या महिलेने कस्टमर ऑफिसर असल्याचे भासवून हॉली नान्सी या महिलेशी संगनमत करून एक लाख पौंड दत्तात्रय यांच्या खात्यात जमा होण्यासाठी वेगवेगळ्या कारणांसाठी ३४ लाख १ हजार ४५९ रुपये भरण्यास सांगितले. दत्तात्रय यांनी विविध खात्यांवर पैसे जमा केले. पैसे जमा करून एक लाख पौंड जमा न करता तसेच जमा केलेले पैसे न देता फसवणूक केली आहे.

Web Title: 34 lakhs loss due to attraction of One lakh pounds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.