पिंपरी-चिंचवडमध्ये ३०७ संशयितांपेैकी २५७ जणांचे अहवाल आले कोरोना निगेटिव्ह ; ४२ रूग्णांच्या अहवालाची प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 17:18 IST2020-04-02T17:17:14+5:302020-04-02T17:18:15+5:30
रूग्णालयात दाखल असणाऱ्या दोन जणांची प्रकृती स्थिर

पिंपरी-चिंचवडमध्ये ३०७ संशयितांपेैकी २५७ जणांचे अहवाल आले कोरोना निगेटिव्ह ; ४२ रूग्णांच्या अहवालाची प्रतीक्षा
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून आजपर्यत एकुण संशयितांची संख्या ३०७ असून ४२ घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी पाठविले असून अहवालाची प्रतीक्षा आहे. तर रूग्णालयात दाखल असणाऱ्या दोन जणांची प्रकृती स्थिर आहे.
कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असून पिंपरी-चिंचवड शहर परिसरात रूग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसत असले तरी संशयितांची संख्या वाढत आहे.
महापालिकेच्या पिंपरीतील वायसीएम आणि भोसरीतील महापालिका रूग्णालयात कोरोनाचे रूग्ण दाखल केले आहेत. आज अखेर ३०७ संशयितांपेैकी २५७ जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत. तर बारा पॉझिटिव्ह रूग्णापैकी दहा जणांवर उपचार करून घरी सोडून देण्यात आले आहे. नव्याने ४२ रूग्णांच्या घशातील द्रवाचे नमुने पुण्यातील एनआयव्हीत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. या अहवालाची प्रतीक्षा आहे. तसेच चौदा दिवसांचे होम क्वारंटाईन पूर्ण झालेल्या परदेशी प्रवाशांची संख्या ४३६ आहे.