पिंपरी-चिंचवडमध्ये 24 तासांत 27 वाहनांची टाेळक्यांकडून ताेडफाेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 14:02 IST2018-06-12T14:02:42+5:302018-06-12T14:02:42+5:30
पिंपरी-चिंचवडमध्ये वाहनांच्या ताेडफीडीचे सत्र सुरुच असून 24 तासार पुन्हा एकदा वाहनांच्या ताेडफाेडीची घटना समाेर अाली अाहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये 24 तासांत 27 वाहनांची टाेळक्यांकडून ताेडफाेड
पिंपरी : अल्पवयीन मुलांनी निगडी सहयोग नगर येथे 8 ते 10 वाहनांची तोडफोड केली. भोसरीत रविवारी रात्री 17 वाहनांची तोडफोड झाली होती,या घटनेला 24 तासाचा अवधी उलटला नाही तोच, निगडी येथे वाहन तोडफोडीची घटना घडली. वाहन तोडफोडीचे सत्र थांबणार का?असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडीतील सहयोग नगर येथे सोमवारी रात्री 11 च्या सुमारास वाहन तोडफोडीचा प्रकार घडला.
सहयोग नगर येथे सोमवारी रात्री अकराच्या सुमारास चार अल्पवयीन मुलांचे आपापसात किरकोळ कारणावरून भांडण सुरू होते. याच भांडणातून त्यांनी परिसरातील वाहनांवर दगड आणि काठ्या मारून तोडफोड केली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच निगडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मारहाण आणि तोडफोड करणा-या दोन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर दोघेजण घटनास्थळावरून पळून गेले.