शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

शासकीय, अनुदानित शाळांतील २५ हजार विद्यार्थी ड्रॉप बॉक्समध्ये

By प्रकाश गायकर | Updated: January 15, 2025 12:28 IST

अनुदानापासून वंचित : गैरहजर राहिल्याचा परिणाम

प्रकाश गायकरपिंपरी : जास्त काळ गैरहजर राहिलेल्या विद्यार्थ्यांना शालाबाह्य विद्यार्थी समजण्यात येते. अशा विद्यार्थ्यांची नावे पटावरून कमी करून ड्रॉप बॉक्समध्ये टाकली जातात. विविध शासकीय व अनुदानित शाळांतील सुमारे २५ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी ड्रॉप बॉक्समध्ये वर्ग झाले आहेत. त्यामुळे त्यांना शासनाकडून मिळणारे अनुदान देखील मिळत नाही.सलग एक महिना किंवा त्यापेक्षा जास्त काळ गैरहजर असलेले विद्यार्थी ‘ड्रॉप बॉक्स’मध्ये वर्ग झाले आहेत. मात्र, बहुतांश विद्यार्थी इतरत्र शिक्षण घेत असतात. तरीही शासनदरबारी त्यांची नोंद ‘ड्रॉप बॉक्स’मध्ये असते. परिणामी, अशा विद्यार्थ्यांना शासनाकडून गणवेश किंवा पाठ्यपुस्तक अनुदान मिळत नाही. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये ‘ड्रॉप बॉक्स’मधील विद्यार्थी कमी करण्यासाठी शाळा स्तरावरून योग्य प्रयत्न करण्याची सूचना शालेय शिक्षण विभागाने केली आहे. शहरात शासकीय व अनुदानित शाळेतील साधारण २५ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी ‘ड्रॉप बॉक्स’मध्ये आहेत.ड्रॉप बॉक्समधील विद्यार्थी प्रत्यक्ष कोणत्या तरी शाळेत शिक्षण घेत असल्याने त्यांना पाठ्यपुस्तके दिले जातात. मात्र, केंद्र शासनाकडून पाठ्यपुस्तकांचे अनुदान प्राप्त होताना विद्यार्थ्यांचे गणवेश किंवा पाठ्यपुस्तक अनुदान मिळत नाही. त्याने पाठ्यपुस्तक वाटपाचा ताळमेळ लागत नाही. विद्यार्थ्यांची शाळेतील गैरहजेरी कमी करून त्यांना शाळेत टिकवून ठेवणे हे आव्हानात्मक बनले आहे. या विद्यार्थ्यांमुळे मुख्याध्यापकांना पटसंख्येची मांडणी करणे, शालेय पोषण आहाराचा ताळेबंद जुळवण्यास नेहमीच कसरत करावी लागते. त्यामुळे गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे गैरहजेरीचे नेमके कारण काय ? हे शोधण्याचे आव्हान शिक्षकांसमोर आहे.ड्रॉप बॉक्स म्हणजे काय?शाळेत एखादा विद्यार्थी सलग एक महिन्यापेक्षा जास्त काळ गैरहजर राहिल्यास अशा विद्यार्थ्याला शाळेच्या पटावरून कमी करण्यासाठी स्टुडंट पोर्टलमध्ये ‘ड्रॉप बॉक्स’मध्ये टाकण्याची सुविधा आहे. सतत गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांस ‘ड्रॉप बॉक्स’मध्ये टाकणे बंधनकारक आहे. विद्यार्थी काही काळाने पुन्हा हजर झाल्यास अशा विद्यार्थ्यांना पुन्हा प्रणालीमध्ये घेण्यात येते.

प्रत्येक शाळांमधील ड्रॉप बॉक्सची संख्या कमी करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या शाळांमध्ये असे विद्यार्थी आहेत त्या मुख्याध्यापकांची बैठक घेण्यात येणार आहे. त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर योग्य तो पर्याय काढला जाईल. - संगीता बांगर, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग, महापालिका

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेEducationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थीSchoolशाळा