शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अवैध धंद्यांतील १२२ आरोपींना अटक; सव्वा लाखाची दारू, जुगार साहित्य जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 14:14 IST

‘मटका किंग’, जुगार अड्ड्यावाल्यांचे धाबे दणाणले

ठळक मुद्दे‘लोकमत’च्या वृत्तमालिकेनंतर पोलिसांची कारवाई :पोलिसांनी १२२ आरोपींना अटक करून सव्वा लाखाच्या दारूसह जुगाराचे आणि इतर साहित्य जप्त

पिंपरी : उद्योगनगरीतील अवैध धंद्यांवर कारवाई करून शहर भयमुक्त करण्याच्या उद्देशाने स्वतंत्र पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय १५ ऑगस्ट २०१८ रोजी कार्यान्वित केले. मात्र, त्यानंतरही अवैध धंदे व गुन्हेगारीत सातत्याने वाढ झाल्याचे दिसून येते. याबाबत  'स्टिंग ऑपरेशन व ‘अवैध धंद्यांचे आगार’ ही वृत्तमालिका प्रसिद्ध करून ‘लोकमत’ने पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांना उजेडात आणले. त्यामुळे या धंद्यांवाल्यांचे धाबे दणाणले. पोलिसांनी १२२ आरोपींना अटक करून सव्वा लाखाच्या दारूसह जुगाराचे आणि इतर साहित्य जप्त केले आहे.........उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी पोलिसांचा ‘इंडस्ट्रियल सेल’ स्थापन केला आहे. त्या माध्यमातून उद्योजकांशी चर्चा करण्यात येते. तसेच गुन्हेगारी रोखण्यासाठी उपाययोजना करण्यास मदत होत आहे. परिणामी एमआयडीसीतील गुन्हेगारी मोडीत काढण्यात यश आले आहे. फ्रेंच व जर्मन कौन्सलर यांनी पोलीस आयुक्तालयाला नुकतीच भेट दिली होती. त्यावेळी त्यांच्याशी गुन्हेगारीबाबत चर्चा करण्यात आली. एमआयडीसीत गुन्हेगारांचा कोणताही त्रास नाही. येथील गुन्हेगारी रोखल्याबद्दल फ्रेंच व जर्मन कौन्सलर यांनी पोलिसांचे कौतुक केले आहे, असे आयुक्त संदीप बिष्णोई यांनी सांगितले.................स्टिंग आॅपरेशन’ करून ‘लोकमत’ने केला पर्दाफाश ४अवैध धंद्यांमुळे राज्यभरातील व देशभरातील गुन्हेगारांना शहरात आश्रय घेणे सहज शक्य होत आहे. त्यामुळे महिला, विद्यार्थ्यांनी, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्यांसह शहराच्या सुरक्षेचाही प्रश्न आहे. तसेच अनेक कुटुंबांची वाताहत हो असून, महिला व मुले रस्त्यावर येत आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी अवैध धंद्यांना आळा घालणे आवश्यक आहे. पोलिसांनी याबाबत दक्ष राहून योग्य उपाययोजना करून कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र, असे असतानाही शहरात अवैध धंदे राजरोस सुरू असल्याचे दिसून येते. याबाबत ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन करून पर्दाफाश केला. त्याची धास्ती घेऊन काही अवैध धंदेवाल्यांनी गाशा गुंडाळला, तर काही शहरातून गायब होण्याच्या मार्गावर आहेत. तसेच खडबडून जागे झालेल्या पोलीस यंत्रणेकडूनही अवैध धंद्यांवर कारवाईला सुरुवात केली आहे..............हुक्का पार्लरवर कारवाईहिंजवडी पोलिसांनी हुक्का पार्लरवर कारवाई केली. यात चार हुक्का पॉट, चार हुक्का पार्लर पाईप, सहा हजारांचे हुक्का फ्लेवर बॉक्स असे एकूण १२ हजार ८०० रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. तर विक्रीसाठी गांजा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून ९८ हजार ७५ रुपये किमतीचा तीन किलो ९७३ ग्रॅम गांजा तसेच रोख २२० रुपये व ५५ हजार रुपये किमतीची दुचाकी असा एक लाख ५३ हजार २९५ रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला.  ................‘भयमुक्त शहर’ या संकल्पनेनुसार पोलिसांकडून काम सुरू आहे. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कोणताही सामान्य नागरिक कितीही वाजता, कोणत्याही भागात वावर करू शकतो. अत्याचार, गंभीर गुन्हे, लूटमार तसेच सोनसाखळी चोरीचे प्रकार रोखण्यात यश आल्याने महिलाही सुरक्षित आहेत.  हीच ‘भयमुक्त शहर’ संकल्पना आहे.- संदीप बिष्णोई, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड........

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडliquor banदारूबंदीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी