पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी कोरोनाच्या नव्या ११२ रुग्णांची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 21:22 IST2022-01-01T21:21:12+5:302022-01-01T21:22:13+5:30
सद्यस्थितीत शहरात कोरोनाचे ४६४ सक्रिय रुग्ण आहेत. त्यांपैकी २२८ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. तर २३६ रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. शहरात आतापर्यंत २७९२४८ रुग्णांची नोंद झाली आहे. तर शहराच्या हद्दीतील ४५२६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २७४९८९ जण कोरोनातून बरे झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी कोरोनाच्या नव्या ११२ रुग्णांची नोंद
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी कोरोनाच्या नवीन ११२ रुग्णांची नोंद झाली आहे. मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. शनिवारी एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. शहरात दिवसभरात ७०४८ जणांच्या कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. तर ११० जण कोरोनातून बरे झाले आहेत.
सद्यस्थितीत शहरात कोरोनाचे ४६४ सक्रिय रुग्ण आहेत. त्यांपैकी २२८ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. तर २३६ रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. शहरात आतापर्यंत २७९२४८ रुग्णांची नोंद झाली आहे. तर शहराच्या हद्दीतील ४५२६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २७४९८९ जण कोरोनातून बरे झाले आहेत.
दैनंदिन सर्वेक्षणांतर्गंत ७५८ घरांना भेट देण्यात आली आहे. तर १९०६ लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. सद्यस्थितीत ३८ मेजर कन्टेंनमेंट झोन आहेत. तर ३०८ मायक्रो कन्टेंनमेंट झोन आहेत. ७५७० जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.