शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

मेट्रोचा १०४८ कोटींचा आराखडा; पिंपरी ते निगडी मार्गाला ‘स्थायी’ची मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 2:50 AM

पहिल्या टप्प्यात साडेचार किलोमीटरसाठी वाढीव २०५ कोटींचा खर्च

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने संपूर्ण खर्चाची जबाबदारी स्वीकारल्याने महामेट्रो कंपनीने ‘पिंपरी ते निगडी’पर्यंत सुमारे साडेचार किलोमीटरचा (४.४ किमी) वाढीव मेट्रो मार्गाचा विस्तृत प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार केला. सुमारे एक हजार ४८ कोटींच्या मूळ आराखड्यासह वाढीव २०० कोटींच्या खर्चाला स्थायी समितीने मंगळवारी (दि. ११) मान्यता दिली. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर हा आराखडा राज्य व केंद्र शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात पिंपरी ते स्वारगेट या सुमारे १६ किलोमीटरच्या मार्गाचे काम सुरू आहे. परंतु, ही मेट्रो निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत पुढे नेण्याची मागणी पिंपरी-चिंचवडचे नागरिक व स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांची आहे. या मागणीनुसार महापालिका आयुक्तांच्या सूचनेप्रमाणे महामेट्रो रेल कॉर्पोरेशन कंपनीने निगडीपर्यंत मेट्रोचा आराखडा तयार केला. त्या डीपीआरचे मंगळवारी महापालिका स्थायी समितीपुढे सादरीकरण करण्यात आले. स्थायी समिती बैठकीच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या. पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीत पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील ग्रेड सेपरेटरवर दापोडी हॅरिस पूल ते चिंचवडच्या मदर टेरेसा उड्डाणपुलापर्यंत मेट्रोचे काम सुरू आहे. हे अंतर सुमारे आठ किलोमीटर आहे. यामध्ये वाढीव निगडी मेट्रो मार्गामुळे आणखी साडेचार किलोमीटरची भर पडणार आहे. त्यामुळे शहरातील दापोडी ते निगडी अशा दोन हद्दी मेट्रोने जोडल्या जाणार आहेत.स्थायीला सादर केलेल्या प्रस्तावात या वाढीव मेट्रो प्रकल्पासाठी एक हजार ४८ कोटी खर्च अपेक्षित धरला होता. त्यात स्थायीसमोरील सादरीकरणादरम्यान भूसंपादन व इतर कामांसाठी आणखी २०५ कोटी रुपयांचा खर्च वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे या मेट्रो प्रकल्पासाठी एकूण एक हजार २५३ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. या वाढीव खर्चासह मेट्रोच्या डीपीआरला स्थायी समितीने मंजुरी दिली.पुणे-पिंपरी-चिंचवड मेट्रोच्या नामकरणाचा ठरावपुणे व पिंपरी-चिंचवड शहरात नागरिकांच्या मागणीनुसार स्थायी समितीने या मेट्रोचे पुणे मेट्रोऐवजी पुणे - पिंपरी-चिंचवड मेट्रो असे नामकरण करण्याचा ठराव उपसूचनेद्वारे केला आहे, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी दिली.निगडी मेट्रोचे फायदेशहराला जोडणारा वेगवान मार्गपिंपरी ते निगडी वेळेची बचतमेट्रो मार्गामुळे हवेचे प्रदूषण नाहीवाहतूककोंडीतून मुक्ततारस्ता दुरुस्तीच्या खर्चात बचतमहामार्गावरील अपघात कमीहिंजवडी मेट्रोच्या कामासाठी परवानगीशिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोमार्ग वाकडमध्ये महापालिकेच्या आताच्या व भविष्यात समाविष्ट होणाऱ्या भागातून जातो. तेथे मेट्रोचे काही खांब उभारण्यात येत आहेत. मेट्रोचे काम करण्यासाठी पीएमआरडीएला परवानगी देण्याच्या प्रस्तावाला ऐनवेळी स्थायीत मंजूर केला.स्वारगेट ते पिंपरी मार्गाच्या पहिल्या टप्प्यातच ही निगडीपर्यंत मेट्रो केल्यास कोट्यवधी खर्चाची बचत होईल. शिवाय निगडी मेट्रोमुळे नागरिकांची वाहतूककोंडीतून सुटका होऊन औद्योगिक विकासाला चालना मिळेल.- तुषार शिंदे, मुख्य समन्वयक, पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरम

टॅग्स :Metroमेट्रोpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड