शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
3
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
4
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
5
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
6
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
7
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
8
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
9
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
10
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
11
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
12
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
13
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
14
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
15
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
17
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
18
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
19
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
20
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ

पिंपरीत बेशिस्त वाहनचालकांकडून सव्वादहा लाखांचा दंड वसूल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 6:53 PM

या चार प्रकारांमध्ये तीन हजार ४३६ खटले दाखल

ठळक मुद्देनियमांचे उल्लंघन : वाहतूक पोलिसांची कारवाई 

पिंपरी : उद्योगनगरीत वाहतूक कोंडीची समस्या आहे. कोंडी सोडविण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, बेशिस्त वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्यात येत असल्याने या उपाययोजना कुचकामी ठरल्याचे दिसून येते. त्यामुळे अशा बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई बडगा उगारला आहे. दोन आठवड्यांत त्यांच्याकडून दहा लाख ३१ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.  पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाल्यानंतर शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यास प्राधान्य देण्यात आले. त्यासाठी वाहतूक विभाग सक्षम करण्यावर भर देण्यात आला. तसेच विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मात्र बेशिस्त वाहनचालक त्याला जुमानत नसून सर्रासपणे वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. त्यामुळे सातत्याने वाहनांचा खोळंबा होणे, कोंडी होणे अशा समस्या कायम आहेत. त्यामुळे अशा बेशिस्त वाहनचालकांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. १ ते १५ फेब्रुवारी दरम्यान विशेष मोहीम राबविण्यात आली.  मद्यपान करून वाहन चालवणे (ड्रंक अँड ड्राइव्ह), विरुद्ध दिशेने वाहन चालवणे (राँग साईड), वेग मर्यादेपेक्षा जास्त वेगात वाहन चालवणे (ओव्हर स्पीड), वाहनांच्या काचांना काळी फिल्म लावणे (टेंटेड ग्लास) या चार प्रकारांमध्ये तीन हजार ४३६ खटले दाखल करून त्यामध्ये १० लाख ३१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.  ड्रंक अँड ड्राइव्ह करणाऱ्या १९५ वाहन चालकांवर खटले दाखल करण्यात आले आहेत. ही सर्व प्रकरणे न्यायालयात सादर करण्यात आली आहेत. चुकीच्या किंवा विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या एक हजार ३५८ वाहनचालकांवर कारवाई करत त्यांना एक लाख ३५ हजार ८०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. अतिवेगाने वाहन चालवणाऱ्या ६४२ जणांना सहा लाख ४७ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. वाहनांच्या काचांना काळ्या फिल्म लावलेल्या एक हजार २४१ वाहनांवर कारवाई करण्यात आली. तसेच काचांचे काळे फिल्मिंग काढण्यात आले. अशा वाहन चालकांना दोन लाख ४८ हजार २०० रुपयांचा दंड आकारला आहे.

बेशिस्त वाहनचालकांकडून सव्वादहा लाखांचा दंड वसूल (जोड)

बेशिस्त वाहनचालकांवर १ ते १५ फेब्रुवारी दरम्यान केलेली कारवाई

नियमांचे उल्लंघन        खटले        दंडड्रंक अँड ड्राईव्ह           १९५       राँग साईड                १३५८        १३५८००ओव्हर स्पीड            ६४२        ६४७०००टेंटेड ग्लास            १२४१        २४८२००

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस