जगातली 5 सर्वात खतरनाक पर्यटनस्थळं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 04:21 PM2019-10-23T16:21:08+5:302019-10-23T16:23:35+5:30

झांगजियाजी ग्लास ब्रिज, झांगजियाजी, चीन- झांगजियाजी ग्लास ब्रिज हे जगातलं एक ग्लास बॉटमसह सर्वात मोठा आणि उंच ब्रिज आहे. या ब्रिजवरून चालल्यानंतर जमिनीपासून हवेत 984 फूट उंचावरून चालल्याचा भास होतो.

ब्रोमो टेंगर सेमरू नॅशनल पार्क, जावा, इंडोनेशिया- ब्रोमो टेंगर सेमरू नॅशनल पार्क इंडोनेशियाच्या सर्वात मोठ्या ज्वालामुखी क्षेत्रांपैकी एक आहे. हे 308 वर्ग मैलच्या एका प्रभावशाली क्षेत्रात आहे.

पेड्रा दा गेविया, रियो डी जनेरियो, ब्राझील- पेड्रो दा गेविया हे जगातलं सर्वात मोठं पर्वत आहे. हे पर्वत विशाल 2762 फूट उंचावर आहे. या पर्वतावरून निसर्गरम्य दृश्य पाहायला मिळतात.

माउंट हुआ, चीन- माउंट हुआ हा रस्ता ट्रेल्सपासून बनलेला आहे. हा लाकडापासून तयार करण्यात आलेला रस्ता अत्यंत खतरनाक आहे. हा एक भीतीदायक मार्ग आहे. इथून पर्यटकांना ये-जा करताना थरारक अनुभव येतो.

डेव्हिल्स पूल, व्हिक्टोरिया फॉल्स, जाम्बिया- डेव्हिल्स पूल हा एक प्राकृतिक पूल आहे. ज्याचं निर्माण हजारो वर्षांपूर्वी झालं आहे. या पुलामुळे अद्भुत संगीताबरोबरच एक नयनरम्य दृश्य पाहायला मिळतं.