काय असते डेथ रेस, 70 वर्षांच्या महिलेनं जिंकली खतरनाक स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 11:01 PM2019-10-14T23:01:33+5:302019-10-14T23:08:50+5:30

इच्छाशक्तीच्या बळावर आपण असाध्य गोष्टही साध्य करून दाखवू शकतो. अशाच एका 70 वर्षांच्या मिर्था मुनोज यांनी डेथ रेस जिंकली आहे.

खरं तर ही डेथ रेस जिंकण्यासाठी त्यांनी दाखवलेली चिकाटी, प्रेरणा, उत्साह वाखाणण्याजोगा आहे. जवळपास पाच वर्षांपूर्वीच मिर्था यांच्या मुलाचा मृत्यू झाला.

जेव्हा शेजाऱ्यांनी त्यांना सायकलिंग करण्यास सुचवलं तेव्हा त्यांच्या आयुष्यात एक वेगळीच ऊर्जा संचारली.

65 वर्षांच्या मिर्थानं सायकलिंग करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात नवा उत्साह आणि जोश आला.

त्यानंतर त्यांचा आत्मविश्वास कमालीचा दुणावला आणि त्यांनी डेथ रेसमध्ये सहभाग घेतला.

इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी डेथ रेसमध्ये विजयही मिळवला. ज्याला डेथ रोड संबोधलं जातं, तिकडे ही स्पर्धा घेतली जाते.