वेब सिरीजसाठी शुटींग करायचंय ? 'या' शहारांना भेट द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 16:55 IST2019-04-09T16:51:36+5:302019-04-09T16:55:06+5:30

'गोवा' हे भारतासह विदेशी पर्यटकांचेही आवडीचे डेस्टीनेशन आहे. समुद्र किनारी मोकळ्या हवेचा आणि लाटांचा मनमुराद आनंद येथे घेता येईल. तर शुटींगसाठीही हे बेस्ट ठिकाण आहे.

थंड हवेचं ठिकाण म्हणून जेवढं काश्मीर प्रसिद्ध आहे, तितकच भारताची सीमारेषा म्हणूनही काश्मीर जगप्रसिद्ध आहे. या काश्मीरमध्येही शुटींगसाठी मोस्ट रोमँटीक ठिकाणं आहेत.

देशाची राजधानी दिल्ली म्हणजे अफलातूनच. लाल किल्ला, इंडिया गेट यांसह ऐतिहासिक ठिकाणांचं मिश्रण म्हणजे दिल्ली होय. या दिल्लीत लहान-सहान शुटींगपासून ते दिग्गज चित्रपटांच शुटींग केलं जाऊ शकतं.

पंजाबमधील अमृतसर हे शुटींगसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. चित्रपटात पंजाबी माहोल निर्माण करायचा असल्यास अमृतसरला भेट देणं कंपल्शनचं ठरतं.

मुंबई अन् बॉलिवूडचं अनोखं नात आहे. अमिताभ बच्चनचा दिवार असेल किंवा नाना पाटेकरचा तिरंगा मुंबईच चित्रीकरण झालं नाही असं नाही. त्यामुळे मुंबईला शुटींग डेस्टीनेशन म्हटलं जातं.