शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Travel : पहिल्यांदाच परदेशवारी करताय? थायलंड की व्हिएतनाम... तुमच्यासाठी बेस्ट देश कोणता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 12:02 IST

1 / 9
आयुष्यातली पहिली परदेशवारी म्हटली की, उत्साह आणि गोंधळ दोन्ही सोबत येतात. बजेटमध्ये बसणारे आणि व्हिसासाठी जास्त कटकट नसलेले देश म्हणून भारतीय पर्यटकांच्या यादीत 'थायलंड' आणि 'व्हिएतनाम' ही दोन नावे सर्वात वर असतात. पण, या दोन्हीपैकी नक्की कोणत्या देशाची निवड करायची? असा प्रश्न अनेकांना पडतो.
2 / 9
सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे, भारतीय पर्यटकांसाठी थायलंड आणि व्हिएतनाम हे दोन्ही देश सध्या 'व्हिसा फ्री' आहेत. त्यामुळे कागदपत्रांची जंत्री आणि दूतावासाच्या चकरा मारण्याची गरज नाही. तुम्ही बॅग भरून थेट विमानतळ गाठू शकता!
3 / 9
थायलंडमध्ये फिरणे थोडे महाग पडू शकते. विशेषतः लोकप्रिय पर्यटन स्थळांवर हॉटेल, शॉपिंग आणि मनोरंजनाचे दर थोडे जास्त असतात. मात्र, येथील ट्रॅव्हल पॅकेज आणि स्थानिक वाहतूक अतिशय सुटसुटीत आहे.
4 / 9
तर, बजेटचा विचार केल्यास व्हिएतनाम हा थायलंडच्या तुलनेत अधिक स्वस्त आहे. येथील जेवण, राहणे आणि स्थानिक प्रवास खिशाला परवडणारा आहे. इतकेच नाही तर, भारतापासून व्हिएतनामची विमान तिकिटेही थायलंडपेक्षा कमी दरात मिळू शकतात.
5 / 9
जर तुम्हाला नाईटलाईफ, समुद्राचे किनारे आणि भरपूर शॉपिंग आवडत असेल, तर बँकॉक, पट्टाया, फुकेत आणि क्राबी ही ठिकाणे तुमच्यासाठी नंदनवन आहेत. पर्यटनाच्या बाबतीत थायलंड जागतिक स्तरावर अधिक लोकप्रिय आहे.
6 / 9
ज्यांना शांतता, निसर्ग आणि इतिहास आवडतो त्यांच्यासाठी व्हिएतनाम उत्तम आहे. हनोई, हालॉन्ग बे, दा नांग आणि हो ची मिन्ह सिटी ही शहरे पाहण्यासारखी आहेत. येथील निसर्गसौंदर्य तुमचे मन मोहून टाकेल.
7 / 9
पहिल्यांदाच परदेशात जाणाऱ्यांसाठी थायलंड हा अधिक फ्रेंडली देश मानला जातो. याचे कारण म्हणजे तेथील लोकांना इंग्रजी बऱ्यापैकी समजते आणि भारतीय जेवण पावलोपावली सहज उपलब्ध होते.
8 / 9
दुसरीकडे, व्हिएतनाममध्ये भाषेची थोडी अडचण येऊ शकते. पण जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्हाला गर्दीपासून दूर निसर्गाच्या सानिध्यात राहायचे असेल, तर व्हिएतनाम हा एक सुरक्षित आणि सुंदर पर्याय आहे.
9 / 9
जर तुम्हाला धम्माल, मस्ती, शॉपिंग आणि झगमगाट हवा असेल तर 'थायलंड'ला पसंती द्या. पण, जर तुम्हाला कमी खर्चात ऐतिहासिक वारसा आणि निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल, तर 'व्हिएतनाम'ची तिकीटं बुक करा!
टॅग्स :tourismपर्यटनThailandथायलंडVietnamविएतनाम