ब्ल्यू सिटीचे सौंदर्य पाहण्यासाठी 'या' ठिकाणाला नक्की भेट द्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 05:41 PM2020-01-13T17:41:44+5:302020-01-13T18:09:58+5:30

जोधपूर हे राजस्थानमधील दुसरं मोठं शहर आहे. ऐतिहासीक वास्तुंचे पाहण्याचे वेड असलेल्या लोकांसाठी हे ठिकाण खूप खास आहे.

भारतातच नाही तर जगभरात प्रसिध्द असलेले ठिकाण आहे. या शहराला ब्ल्यू सिटी असं सुद्धा म्हणतात.

जोधपूर या ठिकाणी अनेक ऐतिहासिक वास्तु आहेत. जगभरातून मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात.

जर तुम्ही राजस्थानला फिरायला गेलात तर मेहरानगड, मंडोर गार्डन, राव जोधा डेजर्ट रॉक पार्क, बालसमंद झील, कायलाना झील, घंटाघर या ठिकाणांना नक्की भेट द्या

या ठिकाणापासून काही अंतरावर माऊट आबू हे पर्यटन स्थळ आहे.

निळ्या रंगात असलेल्या या शहराचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे.

फोटोग्राफीचाी आवड असलेले पर्यटक या ठिकाणी आकर्षक वास्तुंचे फोटो काढू शकतात.

इथल्या वास्तुंबरोबरच खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेण्याची मजा काही वेगळीच आहे.

ज्या लोकांना खवय्येगिरीची मजा घेण्याची आवड आहे. असे लोक या ठिकाणी प्रसिध्द असलेल्या गुलाबजामच्या भाजीचा आस्वाद घेऊ शकतात.