शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Travel : 'या' ठिकाणाचं ८५ अक्षरी नाव, वाचताना फुटेल घाम; पण यामागची 'ती' प्रेमकहाणी जिंकून घेईल तुमचं मन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 16:41 IST

1 / 7
ओळख सांगण्यासाठी नाव पुरेसं असतं, असं आपण म्हणतो. पण एखाद्या जागेचं नावच जर ८५ अक्षरांचं असेल, तर? वाचायला अशक्य वाटणारं आणि उच्चारताना जिभेला पीळ पाडणारं हे नाव न्यूझीलंडमधील एका हिल स्टेशनचं आहे.
2 / 7
विशेष म्हणजे, या नावामुळे या ठिकाणाची नोंद 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये झाली असून, या कठीण नावामागे एका महान योद्ध्याच्या प्रेमाची अतिशय सुंदर कहाणी दडली आहे.
3 / 7
या डोंगररांगेचं पूर्ण नाव आहे -Taumatawhakatangihangakoauauotamateaturipukakapikimaungahoronukupokaiwhenuakitanatahu. हो, हे एकच नाव आहे! एवढं मोठं नाव लक्षात ठेवणं किंवा बोलणं कोणालाही शक्य नसल्यानं स्थानिक लोक याला प्रेमानं 'टॉम्टा हिल' असं म्हणतात. न्यूझीलंडच्या नॉर्थ आयलंडमधील 'हॉक्स बे' परिसरात ही डोंगररांग स्थित आहे.
4 / 7
हे नाव केवळ अक्षरांचा समूह नाही, तर तो एक पूर्ण वाक्याचा अर्थ आहे. माओरी संस्कृतीतील महान पूर्वज आणि योद्धा 'टामेटेआ' यांच्याशी ही कथा जोडलेली आहे. या नावाचा मराठीत अर्थ होतो - 'ते टोक, जिथे मोठ्या गुडघ्यांचा माणूस, डोंगर चढणारा, जमीन गिळंकृत करणारा आणि जग फिरणारा 'टामेटेआ' आपल्या प्रेयसीसाठी बासरी वाजवत असे.' एका महान योद्धानं आपल्या प्रेयसीप्रती व्यक्त केलेलं हे प्रेम आजही या नावाच्या रूपानं जिवंत आहे.
5 / 7
सुमारे ३०५ मीटर उंच असलेली ही टेकडी चहूबाजूंनी हिरव्यागार शेतांनी वेढलेली आहे. इथलं शांत वातावरण आणि नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालतं. आश्चर्याची बाब म्हणजे, भारतीय पर्यटकांमध्येही हे ठिकाण प्रचंड लोकप्रिय आहे.
6 / 7
याचं महत्त्वाचं कारण म्हणजे इथे मिळणारी शाकाहारी जेवणाची उत्तम सोय! केवळ नाव पाहण्यासाठी आणि त्या नावाच्या बोर्डसोबत फोटो काढण्यासाठी जगभरातून लोक इथे येतात.
7 / 7
जगातील कोणत्याही ठिकाणाचं हे सर्वात लांब नाव असल्यानं याची नोंद 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स'मध्ये करण्यात आली आहे. जर तुम्हालाही आयुष्यात काहीतरी हटके पाहायचं असेल आणि जिभेला कसरत द्यायची असेल, तर न्यूझीलंडच्या या टॉम्टा हिलला नक्की भेट द्यायला हवी.
टॅग्स :New Zealandन्यूझीलंडtourismपर्यटन