शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Travel : थायलंड झालं आता जुनं; जगातील 'या' ५ ठिकाणांची नाईट लाईफ पाहून हरखून जाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 14:36 IST

1 / 7
जेव्हा आपण 'नाईटलाईफ' किंवा रात्रीच्या पर्यटनाचा विचार करतो, तेव्हा डोळ्यांसमोर सर्वात आधी नाव येते ते म्हणजे थायलंड. पण, थायलंडच्या पलीकडेही एक असे जग आहे, जे रात्रीच्या वेळी लख्ख प्रकाशात न्हाऊन निघते आणि जिथला उत्साह पाहून तुमचेही पाय थिरकल्याशिवाय राहणार नाहीत.
2 / 7
जोना नॉर्ते, मेक्सिको : मेक्सिकोमधील जोना नॉर्ते हे ठिकाण तिथल्या मुक्त नाईटलाईफसाठी प्रसिद्ध आहे. या परिसरात अनेक क्लब्स आणि स्थानिक बाजार रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. इथला माहोल अतिशय जिवंत आणि ऊर्जेने भरलेला असतो, जो पर्यटकांच्या कायम लक्षात राहतो.
3 / 7
विला मिमोसा, ब्राझील : रियो डी जनेरियोमधील विला मिमोसा हे ठिकाण स्थानिक नाईटलाईफसाठी अत्यंत लोकप्रिय आहे. गजबजलेले रस्ते, छोटे छोटे बार आणि तिथला संगीत सोहळा यामुळे हे ठिकाण नेहमीच चर्चेत असते. ब्राझिलियन संस्कृतीची खरी झलक तुम्हाला येथे रात्रीच्या वेळी पाहायला मिळेल.
4 / 7
पिगाल, फ्रान्स : पॅरिस म्हणजे केवळ आयफेल टॉवर नव्हे! मोंटमार्ट्रे टेकडीच्या पायथ्याशी असलेले 'पिगाल' हे पॅरिसच्या नाईटलाईफचे प्रतीक आहे. एकेकाळी हे ठिकाण कलाकारांचे आणि संगीतकारांचे केंद्र होते. आजही येथील कॅफे आणि कॉन्सर्ट हॉल्स पर्यटकांना आकर्षित करतात. पॅरिसच्या वारीत इथल्या रंगीन रात्रींचा अनुभव घेणे ही एक पर्वणीच असते.
5 / 7
काबुकिचो, जपान : टोक्योच्या शिंजुकु भागात वसलेले काबुकिचो हे ठिकाण 'स्लीपलेस डिस्ट्रिक्ट' म्हणून ओळखले जाते. दुसऱ्या महायुद्धानंतर या भागाचा कायापालट झाला. आज येथे हजारो रेस्टॉरंट्स, कराओके बार आणि नाईट क्लब आहेत. जपानच्या पारंपरिक संस्कृतीसोबतच आधुनिक नाईटलाईफचा अनुभव घ्यायचा असेल, तर काबुकिचोला पर्याय नाही.
6 / 7
रीपरबान, जर्मनी : हॅम्बर्गमधील रीपरबान हे एकेकाळी केवळ नाविक आणि कारागिरांचे केंद्र होते. मात्र, आज हे ठिकाण जगातील सर्वात प्रसिद्ध 'एंटरटेनमेंट डिस्ट्रिक्ट' पैकी एक आहे. विशेष म्हणजे, जगातील प्रसिद्ध 'द बीटल्स' बँडने आपल्या करिअरची सुरुवात याच गल्लीतून केली होती. येथे तुम्हाला अनेक म्युझिक क्लब, थिएटर्स आणि रोषणाईने न्हाऊन निघालेले रस्ते पाहायला मिळतील.
7 / 7
या ठिकाणची नाईटलाईफ जरी आकर्षित असली, तरी कोणत्याही देशात फिरताना तिथले स्थानिक नियम आणि सुरक्षिततेच्या बाबींची माहिती नक्की ठेवा. यामुळे तुमची सहल आनंददायी आणि सुरक्षित होईल.
टॅग्स :Nightlifeनाईटलाईफtourismपर्यटनInternationalआंतरराष्ट्रीय